Jasprit Bumrah’s Replacement : दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह आयपीएल 2023 मधून बाहेर पडला आहे. बुमराहच्या अनुपस्थितीमुळे मुंबईचे टेन्शन वाढले होते. पण आता आयपीएल सुरु होण्याआधीच मुंबईने जसप्रीत बुमराहच्या जागी संघात संदीप वॉरियर याला स्थान दिलेय. (Sandeep Warrier joins Mumbai Indians as Jasprit Bumrah’s replacement) संदीप वॉरियर याच्यामुळे मुंबईच्या गोलंदाजी थोडीफार मजबूत होईल. संदीप वॉरियर बुमराहची कमी भरून काढू शकणार नाही, पण थोडीफार मजबूती देऊ शकतो. संदीप वॉरियर याला मुंबईने 50 लाख रुपयांमध्ये ताफ्यात घेतलेय. संदीप वॉरियर याने याआधी आयपीएलमध्ये कोलकाता आणि आरसीबी संघाचे प्रतिनिधित्व केलेय. वॉरियर आयपीएलमध्ये पाच सामने खेळला आहे. 


वेगवान गोलंदाज संदीप वॉरियर आता बुमराहच्या जाही यंदाच्या हंगामात मुंबईच्या जर्सीमध्ये खेळताना दिसेल. संदीप वॉरियर याने 2021 मध्ये टीम इंडियामध्ये पदार्पण केले होते. संदीप वॉरियर याला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा तगडा अनुभव आहे. आरसीबीविरोधात होणाऱ्या सामन्यापूर्वी वॉरियर मुंबई संघाचा भाग होईल.  31 वर्षीय संदीप वॉरियर याआधी आयपीएलमध्ये आरसीबी आणि कोलकाता संघाचा भाग राहिलाय. संदीप वॉरियर याने आयपीएलच्या पाच सामन्यात दोन विकेट घेतल्या आहेत. तर एकमेव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याची विकेटची पाटी कोरीच राहिली. 






देशांतर्गत क्रिकेटमध्ये कशी राहिली कामगिरी ?
संदीप वॉरियर याच्याकडे देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचा मोठा अनुभव आहे.  2012 मध्ये त्याने केरळ संघातून पदार्पण केले होते. सध्या तो तामिळनाडू संघासाठी खेळतोय. त्याने देशांतर्गत क्रिकेटमधील 68 टी 20 सामन्यात 62 विकेट घेतल्या आहेत. तर 69 लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 83 विकेट घेतल्यात. त्याशइवाय फर्स्ट क्लास सामन्यात त्याने 217 विकेट घेतल्या आहेत. 
 
मुंबई इंडियन्स संघाचे संपूर्ण स्क्वाड (Mumbai Indians Squad)
रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, कॅमरून ग्रीन, टिम डेविड, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, पियूष चावला, ईशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, संदीप वॉरियर, अर्जुन तेंदुलकर, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, जेसन बेहरेनडॉर्फ, ड्यून जॉनसन, विष्णु विनोद, शम्स मुलानी, नेहल वढेरा, राघव गोयल, झेय रिचर्डसन, आकाश मधवाल  


आणखी वाचा :  


आरसीबीला डबल धक्का! मॅक्सवेल-हेजलवूडच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह



इम्पॅक्ट प्लेअरचा इम्पॅक्ट पडणार, यंदाच्या आयपीएलमध्ये नवे नियम, जाणून घ्या सविस्तर 


IPL 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करणं सोपं नाही; पाहा ताकद आणि कमजोरी