IPL 2023 CSK vs GT : आयपीएलच्या 16 वा हंगाम आजपासून सुरु होणार आहे. गतविजेता गुजरात आणि चेन्नई यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. हार्दिक पांड्या आणि धोनी यांच्या संघात पहिला सामना जिंकण्यासाठी लढत होणार आहे. पण पहिल्या सामन्याआधी एक रंजक आकडेवारी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत... आतापर्यंत झालेल्या 15 हंगामात दोन वेळा पहिला सामना जिंकणारा संघ विजेता ठरला आहे. त्यामुळे सलामीच्या सामन्यात पराभव मिळो अथवा विजय होवो.. टेन्शन घेण्याचे कारण नाही... कारण सलामीचा सामना खेळणाऱ्या संघाला जेतेपदाची जास्त संधी मिळतेय.


IPL 2008 पासून 2022 पर्यंत म्हणजेच 15 हंगामात पाच वेळा पहिला सामना खेळणाऱ्या संघाला चषक मिळाला आहे. यामध्ये विजेत्या संघाला तीन वेळा तर पराभूत होणाऱ्या संघाने दोन वेळा चषकाला गवसणी घातली आहे. म्हणजेच.. एक तृतियांश आयपीएल चषक सलामीचा सामना खेळणाऱ्या संघाला मिळाली आहे. ही आकडेवारी गुजरात आणि चेन्नई या दोन्ही संघासाठी दिलासादायक आहे. या आकडेवारीनुसार, दोन्ही संघाचे चॅम्पियन होण्याचे चान्सेस 33 टक्के आहेत. 


IPL चा सलामीचा सामना जिंकून जेतेपद जिंकणारे संघ - 


सलामीचा सामना जिंकला अन् जेतेपदही जिंकले असे IPL 2011, 2014 आणि 2018 मध्ये घडलेय. IPL 2011 मध्ये CSK ने KKR चा दोन धावांनी पराभव करत पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर फायनलमध्ये आरसीबीचा पराभव करत चषकाला गवसणी घातली होती.  IPL 2014 मध्ये पहिल्या सामन्यात KKR ने मुंबईचा पराभव केला होता. त्यानंतर फायनलमध्ये पंजाबचा पराभव करत चषकावर नाव कोरले होते. अशाच पद्धतीने IPL 2018 च्या सलामीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईचा पराभव केला होता, त्यानंतर फायनलमध्ये हैदराबादला मात देत चषक उंचावला होता. 


IPL IPL चा पहिला सामना गमावला अन् चषक उंचावला 
IPL 2015 च्या सलामीच्या सामन्यात मुंबईला कोलकाता संघाकडून सात विकेटने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर फायनलमध्ये मुंबईने दमदार कामगिरी करत सीएसकेचा पराभव करत जेतेपद पटकावले होते. तसेच 2020 मध्ये मुंबईला सीएसकेकडून सलामीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर फायनलमध्ये दिल्लीचा पराभव करत मुंबईने जेतेपद मिळवले होते. 


आणखी वाचा :  


आरसीबीला डबल धक्का! मॅक्सवेल-हेजलवूडच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह



इम्पॅक्ट प्लेअरचा इम्पॅक्ट पडणार, यंदाच्या आयपीएलमध्ये नवे नियम, जाणून घ्या सविस्तर 


IPL 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करणं सोपं नाही; पाहा ताकद आणि कमजोरी