IPL 2023 : कोलकात्याचा कर्णधार नीतीश राणा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. एडन माक्ररमच्या नेतृत्वातील हैदराबादचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. कोलकाता संघात कोणताही बदल केलेला नाही. नीतीश राणा याने विजयी संघ कायम ठेवला आहे. तर हैदराबादच्या संघात एक बदल करण्यात आला आहे.  हैदराबादने अभिषेक शर्माला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिलेय. तर वॉशिंगटन सुंदर याला राखीव खेळाडू म्हणून उतरवलेय. 


कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH) यांच्यात आज ईडन गार्डन्सवर रनसंग्राम पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांचा आज चौथा सामना असेल. यंदाच्या मोसमात खेळलेल्या तीन सामन्यांपैकी कोलकाता संघाने दोन सामने जिंकले तर एका सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. तर, दुसरीकडे हैदराबाद संघाला तीन सामन्यांपैकी एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. दोन्ही संघामध्ये आज अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते.  इडन गार्डनवर मागील 28 सामन्यात नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 


 कोलकाता नाइट रायडर्स – रहमनुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), एन जगादीशन, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्दुल ठाकुर, सुयश शर्मा, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती. 


सनरायजर्स हैदराबाद – मयंक अग्रवाल, हॅरी ब्रूक, राहुल त्रिपाठी, एडेन मारक्रम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, मार्को यान्सिन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक, टी नटराजन.







Eden Gardens Pitch Report : ईडन गार्डनची खेळपट्टी कशी आहे?


आज आरसीबी आणि केकेआर यांच्यातील सामना कोलकाताच्या घरच्या ईडन गार्डन मैदानावर पार पडणार आहे. ईडन गार्डन स्टेडिअमची (Eden Gardens) खेळपट्टी (Pitch Report) फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. या स्टेडियमच्या लहान आकारामुळे मोठी धावसंख्या पाहायला मिळते. दरम्यान, या मैदानावर दव महत्त्वाची भूमिका बजावते. दव पडल्यानंतर फिरकी गोलंदाजांना या खेळपट्टीवर मदत मिळू लागते, त्यानंतर धावा काढणं कठीण होतं.