Virat Kohli vs Gautam Gambhir : लखनौचा मेंटोर गौतम गंभीरला विराट कोहलीच्या चाहत्यांनी पुन्हा एकदा डिवचलेय. हैदराबादच्या मैदानावर लखनौचा संघ खेळत आहे. यावेळी गौतम गंभीरला पाहून विराटच्या चाहत्यांनी कोहली कोहली अशा घोषणा दिल्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. याआधीही एका सामन्यादरम्यान विराटच्या चाहत्यांनी गौतम गंभीरला डिवचले होते. आयपीएलमध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये झालेले वाद सर्वांनीच पाहिलेत. यामध्ये आता चाहत्यांनीही उडी घेतली आहे. 


आयपीएलच्या सोळाव्या हंगामात आरसीबी आणि लखनौ यांच्या दोन्ही सामन्यात राडा झाला होता. लखनौने आरसीबीला त्यांच्याच मैदानावर पराभूत केले होते..त्यानंतर आवेश खान, गौतम गंभीर यांच्यासह इतर खेळाडूंनी जल्लोष केला होता. दुसऱ्या पर्वात आरसीबीने लखनौला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करत हिशोब चुकता केला होता. या सामन्यात विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात मैदानावर राडा झाला होता.. त्यानंतर सामना झाल्यानंतर गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात बाचाबाची झाली होती. लखनौ आणि आरसीबी यांच्यातील सामना याच कारणामुळे चर्चेत राहिला. सामन्यानंतर सोशल मीडियावरही अद्याप चढाओढ सुरुच होती. कधी विराट कोहली तर कधी नवीन अन् कधी लखनौ संघ कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत होते. विराट कोहलीचे चाहतेही यामध्ये सामील झाले.. गौतम गंभीर याला विराट कोहलीच्या चाहत्यांनी डिवचले. 







हैदराबाद आणि लखनौ यांच्यात सध्या सामना सुरु आहे. हैदराबादच्या फलंदाजीवेळी दुसऱ्या टाईम आऊटच्या दरम्यान खेळाडूंना सल्ला देण्यासाठी गौतम गंभीर मैदानात गेला होता. मैदानातून डगआऊठमध्ये परत येताना स्टेडिअमवरील चाहत्यांनी कोहली कोहली अशा घोषणा देऊन गौतम गंभीरला डिवचले.. गौतम गंभीरने कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधीही चेन्नईविरोधातील सामन्यादरम्यान विराटच्या चाहत्यांनी गौतम गंभीर याला डिवचले होते. 


दरम्यान, पहिल्या डावातील अठराव्या षटकादरम्यान चाहत्यांनी लखनौच्या डगआऊटच्या दिशेने नट आणि बोल्ट फेकल्याचे समोर आलेय. त्यामुळे सामना काहीवेळासाठी थांबवण्यात आला होता.