IPL 2023, SRH vs LSG: हेनरिक क्लासेन आणि अब्दुल समद यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर हैदराबादने निर्धारित २० षटकात सहा विकेटच्या मोबद्लायत १८२ धावांपर्यंत मजल मजल मारली. हैदराबादकडून एकाही फलंजाला अर्धशतक झळकावता आले नाही. लखनौकडून कर्णधार कृणाल पांड्याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. लखनौला विजयासाठी 183 धावांचे आव्हान आहे.


नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादची सुरुवात निराशाजनक झाली. तुफान फॉर्मात असलेला अभिषेक शर्मा अवघ्या सात धावा काढून बाद झाला. पावरप्लेमध्ये हैदराबादला दोन धक्के बसले होते. राहुल त्रिपाठी १३ चेंडूत २० धावा काढून बाद झाला. या खेळीत राहुल त्रिपाठीने चार चौकार लगावले. पावरप्लेमध्ये दोन झटके बसल्यानंतर कर्णधार एडन मार्करम आणि अनमोलप्रीत सिंह यांनी डाव सावरला. दोघांनी हौदराबादचा डाव हालता 


माक्ररम आणि अनमोलप्रीत ही जोडी धोकादायक ठरतेय... असे वाटत असतानाच अमित मिश्रा याने विकेट घेतली. अनमोलप्रीत सिंह ३६ धावा काढून बाद झाला. अनमोलप्रीत सिंह याने आपल्या खेळीत सात चौकार लगावले. अनमोलप्रीत बाद झाल्यानंतर मार्करमही लगेच तंबूत परतला. मार्करम आणि ग्लेन फिलिप एकापाठोपाठ एक बाद झाले. कृणाल पांड्याने लागोपाठ दोन चेंडूवर दोन विकेट घेतल्या. ग्लेन फिलिप याला खातेही उघडता आले नाही. मार्करम याने २० चेंडूत २८ धावांची खेळी केली. या खेळीत दोन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. 



आघीडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर क्लासेन आणि अब्दुल समद यांनी हैदराबादचा डाव सावरला. दोघांनी सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. त्यानंतर आक्रमक रुप घेतले. अर्धशतकी भागिदारी करत हैदराबादच्या डावाला आकार दिला. क्लासन याने २९ चेंडूत ४७ धावांचे योगदानदिले. या खेळीत क्लासेन याने तीन षटकार आणि तीन चौकार लगावले आहेत. क्लासेन आणि अब्दुल समद यांच्यामध्ये ५८ धावांचाी भागिदारी झाली.. हैदराबादसाठी ही सर्वात मोठी भागिदारी झाली. अब्दुल समद याने अखेरीस हैदराबादच्या डावाला आकार दिला. समद याने २५ चेंडूत ३७ धावांचे योगदान दिले. या खेळीत समद याने चार षटकार लगावले. समद आणि क्लासेन यांच्या फटकेबाजीमुळे अखेरच्या पाच षटकात हैदराबादने मोठी धावसंख्या उभारली. 



लखनौकडून कर्णधार कृणाल पांड्या सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.. कृणाल पांड्याने दोन विकेट घेतल्या. तर युद्धवीर सिंह, आवेश खान, यश ठाकूर आणि अमित मिश्रा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.