IPL 2023 : गुजरातविरोधात सूर्यकुमार यादव याने वादळी फलंदाजी करत शतक झळकावले. या शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने २१८ धावांपर्यंत मजल मारली होती. मुंबईने हा सामना २७ धावांनी जिंकला. सूर्यकुमार यादव याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. सूर्यकुमार यादव याने आक्रमक फलंदाजी करत मुंबईची धावंसख्या वाढवली. पावरप्ले संपल्यानंतर फलंदाजीला आलेल्या सुर्यकुमार यादव याने षटकार लगावत शतक झळकावले. सूर्यकुमार यादव याने चांगल्या चेंडूचाही समाचार घेतला. सूर्याच्य पिटाऱ्यामधून एकापेक्षा एक सरस फटके निघत होते. सूर्याचे फटके पाहून प्रेक्षक तर मंत्रमुग्ध झालेच होते.. पण क्रिकेटचा देवची चकित झाला होता. सूर्यकुमार यादव याच्या एका षटकारानंतर सचिन तेंडुलकर याने दिलेली रिअॅक्शन चर्चेचा विषय आहे. सूर्याचा ब्लेड शॉट पाहून सचिन तेंडुलकरही अवाक झाला होता. 


सूर्यकुमार यादव स्कूप शॉट मारण्यात फरफेक्ट आहे. पण यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने नवीन शॉट्स मारला.. हा शॉट्स पाहून सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसलाय. सूर्याच्या फटकेबाजीनंतर आजी-माजी क्रिकेटपटूंनी ट्वीट करत कौतुक केलेय. सचिन तेंडुलकर याचे ट्विट चर्चेत आहे. 


सूर्यासाठी क्रिकेटच्या देवाचं ट्वीट


सचिननं खास सूर्याच्या ब्लेड शॉर्टचं कौतुक करत एक ट्वीट केलंय. त्यासोबत सचिननं त्याच्या शॉर्टचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. सचिन म्हणाला, कालच्या मॅचमध्ये सुर्या तुफान खेळला पण मला आवडलेला शॉट म्हणजे त्यानं थर्डमॅनच्यावरुन मारलेला षटकार... तो शॉट खेळणं फार कठीण असतं आणि जगातील फार कमी खेळाडू हा उत्तम प्रकारे खेळू शकतात. मास्टर ब्लास्टरचे हे ट्वीट चर्चेचा विषय आहे.






सूर्यानं मुंबईला तारलं... 


कालच्या सामन्यात सूर्यानं मुंबईला तारलं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आयपीएल 2023 मध्ये सूर्यकुमार यादव ज्या प्रकारे फलंदाजी करतोय त्यामुळे मुंबई इंडियन्सचं काम सोपं झालं आहे. एकेकाळी, मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल 2023 च्या गुणतालिकेत पिछाडीवर पडल्याचं दिसत होतं, परंतु सूर्यानं सारं चित्रच पालटलं. त्याच्या खेळीमुळे संघाची चिंता दूर झाली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आता 12 पैकी 7 सामने जिंकून प्ले ऑफमध्ये जवळपास पोहोचल्यातच जमा आहे. इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL) मध्ये सध्या सूर्या जबरदस्त फॉर्ममध्ये परतला आहे. 12 मे (शुक्रवार) रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध मुंबई इंडियन्सचा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात सूर्यानं नाबाद शतकी खेळी केली. सूर्यानं 49 चेंडूंचा सामना करत नाबाद 103 धावा केल्या, ज्यात 11 चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता. सूर्याच्या तुफानी फलंदाजीमुळे मुंबई संघाला 218 धावांपर्यंत मजल मारता आली. सूर्यानं आपलं काम केलं अन् त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या गुजरात टायटन्सनं 191 धावांत रोखून 27 धावांनी दणदणीत विजय मिळवला.