IPL 2023, Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bangalore : कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर रंगतदार लढाई सुरु आहे. कोलकात्याने प्रथम फलंदाजी करताना 204 धावांचा डोंगर उभारला आहे. प्रत्युत्तरदाखल विराट कोहली आणि डु प्लेसिस यांनी दमदार सुरुवात केली आहे. या लढतीत खास लक्ष आंद्रे रसेल आणि सुनील नारायण यांच्या कामगिरीवर असेल. आंद्रे रसेल फलंदाजीत अपयशी ठरला पण गोलंदाजीत तो कमाल करु शकतो. आंद्रे रसेल याचा आजचा 100 आयपीएल सामना आहे. तर सुनील नारायण याचा 150 सामना आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष लागलेय.
कोलकाता नाइट रायडर्सचा फिरकी गोलंदाज सुनील नापरायण याचा आज 150 आयपीएल सामना आहे. नारायण कोलकात्यासाठी सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे. एकाच संघाकडून सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत नारायणचा समावेश आहे. सुनील नारायण याने आयपीएलमध्ये आतापर्यंत कोलकात्यासाठी 153 विकेट घेतल्या आहेत . 19 धावा देऊन पाच विकेट, ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. गोलंदाजीशिवाय सुनील नारायण फलंदाजीतही सक्षम आहे. त्याने अनेकदा कोलकात्यासाठी धावांचा पाऊश पाडला आहे. सुनील नारायणशिवाय आंद्रे रसेल याच्यासाठीही आजचा सामना महत्वाचा आहे.
धडाकेबाज अष्टपैलू आंद्रे रसेल आज 100 वा आयपीएल सामना खेलत आहे. कोलकात्यासाठी सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूमध्ये रसेल चौथ्या क्रमांकावर आहे. रसेल आयपीएलमध्ये 2012 पासून खेळत आहे. 2014 मध्ये रसेल कोलकाता संघाचा सदस्य झाला. सुरुवातीचे दोन हंगाम रसेल दिल्लीच्या संघाचा भाग होता. या दोन हंगामात रसेल दिल्लीसाठी सात सामने खेळला आहे. रसेल कोलकात्यासाठी आतापर्यंत 92 सामने खेळला आहे. आज तो कोलकात्यासाठी 93 वा सामना खेळत आहे. आंद्रे रसेल कोलकात्याचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू आहे. रसेल याने आतापर्यंत दोन हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तर 89 विकेटही घेतल्या आहेत.
205 धावांचा बचाव करताना आरसीबीने दमदार सुरुवात केली. पण नारायण याने कोहलीला 18 धावांवर बाद करत कोलकात्याच्या विजयातील मोठा अडथळा दूर केला. रसेलही गोलंदाजीत कमाल करु शकतो. रसेल याने अनेकदा कोलकात्याला विजय मिळवून दिलाय. आज रसेल आणि नारायण कशी गोलंदाजी करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.