Danielle De Villiers wife supporting KKR : ईडन गार्डनच्या मैदानावर कोलकाता आणि आरसीबी यांच्यात चुरशीची लढत सुरु आहे. चार वर्षानंतर ईडन गार्डन मैदानावर सामना होत असल्यामुळे कोलकात्याचे चाहते उत्साही आहेत. शाहरुख खान आणि जुही चावला यांनी ईडन गार्डनला उपस्थिती दर्शवली आहे, त्यामुळे उपस्थित प्रेक्षकांनी कल्ला केला. शाहरुख खानचे चाहते जगभरात पसरले आहेत. आरसीबीच्या एबी डिव्हिलिअर्सची पत्नीही शाहरुख खानची मोठी चाहती आहे. नवरा आरसीबीचा महत्वाचा सदस्य होता, आजही डिव्हिलिअर्सला आरसीबी आपला खेळाडू मानते. पण डिव्हिलिअर्सची पत्नी आयपीएलमध्ये कोलकाता संघाचा सपोर्ट करतेय.. होय खरेय हे.. डॅनिअल डिव्हिलिअर्स आणि एबी डिव्हिलियर्सच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये डॅनिअल केकेआरला सपोर्ट करत असल्याचे सांगतेय. 


डॅनिअल डिव्हिलिअर्स आणि  एबी डिव्हिलिअर्स या नवरा बायकोच्या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यामध्ये या दोघांना काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आवडता अभिनेता कोण? आवडती अभिनेत्री कोण? या प्रश्नांना दोघांची उत्तरे सारखीच होती. पण यंदाच्या आयपीएलमध्ये कोणत्या संघाला सपोर्ट करणार? या प्रश्नाला दोघांची उत्तरे वेगवेगळी आली. एबी डिविलिअर्स याने क्षणाचाही विलंब न करता आरसीबीला सपोर्ट करणार असल्याचे सांगितले. पण त्याचवेळी डॅनिअल डिव्हिलिअर्स हिने आपण कोलकाताला सपोर्ट करणार असल्याचे सांगितले. त्यावर एबीला काही वेळ काय बोलावे हेच समजले नाही. डॅनियल म्हणाली की,  आपण केकेआरला सपोर्ट करतोय ना? शाहरुख खानमुळे केकेआरला सपोर्ट करतोय ना? असे विचारले.. त्यावर डिव्हिलिअर्सने कोणताही प्रतिक्रिया दिली नाही... पण डॅनियल तेथून निघून गेल्याचे दिसतेय. 


डिव्हिलियर्स पती-पत्नीचा मुलाखतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर नेटकर्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओवर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे. 


पाहा व्हायरल होणार व्हिडीओ











कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर आरसीबी आणि कोलकाता यांच्यात रंगतदार सामना सुरु आहे. दोन्ही संघामध्ये आयपीएलमध्ये रंगतदार लढत पाहायला मिळते. आजच्या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ईडन गार्डनवर कोलकात संघ प्रथम फंलदाजीसाटी मैदानात उतरला आहे. संघाच्या सपोर्टसाठी शाहरुख खान आणि जुही चावलाही स्टेडिअममध्ये आले आहेत. शाहरुख खानला पाहताच उपस्थित प्रेक्षकांनी एकच कल्ला केलाय.