2023 IPL Live Marathi News : आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकाताचा संघ ईडन गार्डनवर प्रथम फंलदाजीसाठी उतरणार आहे. तीन वर्षानंतर कोलकाता संघ ईडन गार्डनवर खेळणार आहे. नितीश राणाच्या नेतृत्वात कोलकाता संघ मैदानात उतरणार आहे. नियमीत कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झालाय, त्यामुळे तो आयपीएलला मुकला आहे. आरसीबी आणि कोलकाता संघात आज बदल करण्यात आले आहेत.


रीस टोप्ली याला मुंबईविरोधात दुखापत झाली होती. आरसीबीने आज त्याच्याजागी डेविड विलीला मैदानात उतरवले आहे. तर कोलकात्याने अनुकूल रॉय याच्या जागी सुयेश शर्मा याला संधी दिली आहे. सुयेश शर्मा आज कोलकात्याकडून पदार्पण करत आहे. पाहूयात दोन्ही संघाची प्लेईंग 11 कशी आहे.. 


RCB vs KKR Live Score : कोलकाता नाइट रायडर्सची प्लेईंग 11, कुणाला संधी ? 
मनदीप सिंह, रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकुर, सुनील नारायण, टिम साउदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती 


KKR vs RCB Live : आरसीबीची प्लेईंग 11


विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मायकल ब्रेसवेल, शाहबाज अहमद, डेविड विली, कर्ण शर्मा, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज 


कोलकाता आणि आरसीबी यांच्यातील सामना पाहण्यासाठी अभिनेत्री जुही चावला इडन गार्डनवर आली आहे. कोलकाता संघाने व्हिडीओ पोस्ट केला आहे.  शाहरुख खानही सामना पाहण्यासाठी येणार असल्याचे वृत्त आहे. 






एबी डिविलिअर्सची पत्नी आज केकेआरला सपोर्ट करत आहे. शाहरुख खान याचा संघ असल्यामुळे तिने केकेआरला सपोर्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. एबी आरसीबीच्या सपोर्टसाठी मैदानात उतरत आहे. 






RCB vs KKR Head to Head : कुणाचं पारड जड?



आरसीबी आणि कोलकाता यांच्या आयपीएल स्पर्धेमध्ये एकूण 30 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये कोलकाता वरचढ ठरला आहे. कोलताताने 30 पैकी 16 सामने जिंकले तर, बंगळुरुला 14 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. दोन्ही संघानी सर्वाधिक 200 हून अधिक धावांचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे आजचा सामना रोमांचक ठरणार आहे.



आणखी वाचा : 


राजस्थानला मोठा धक्का, जोस बटलर दुखापतग्रस्त; दिल्लीविरोधात प्लेईंग 11 च्या बाहेर


IPL 2023: 'थँक्स गॉड... उर्वशी नाही आली', दिल्लीच्या सामन्यात पोस्टर व्हायरल, अभिनेत्री म्हणाली... 


IPL 2023 : आयपीएलवर कोरोनाचं सावट, बीसीसीआयकडून खेळाडूंना लाखमोलाचा सल्ला