Virat Kohli In Nets : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात विराट कोहली दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे. विराट कोहलीने तीन सामन्यात ताबोडतोड फलंदाजी केली आहे. विराट कोहलीने आतापर्यंत दोन अर्धशतके लगावत धावांचा पाऊस पाडला आहे. आरसीबीचा पुढील सामना दिल्लीविरोधात आहे, त्यापूर्वी विराट कोहलीने कसून सराव केला. शनिवारी 15 एप्रिल रोजी आरसीबी एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर दिल्लीविरोधात दोन हात करणार आहे. त्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या संघाने कसून सराव केला आहे. यामध्ये विराट कोहलीने नेट्समध्ये घाम गाळला. विराट कोहलीने मोठ मोठे फटके मारत प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांना इशाराच दिला आहे. दिल्ली आणि आरसीबी यांच्यातील सामना शनिवारी दुपारी साडेतीन वाजता सुरु होणार आहे. 


नेट्समध्ये दिसले किंग कोहलीचे विराट रुप 


नेट्समध्ये विराट कोहली कसून सराव केला. आरसीबीने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये विराट कोहली फटकेबाजी करताना दित आहे. किंग कोहलीचे आक्रमक रुप दिसत आहे. कोहली एकापाठोपाठ एक दमदार फटके माराताना दिसत आहे. कोहलीच्या या व्हिडीओवर सोशल मीडियावर कमेंट्स अन् लाईक्सचा पाऊस पडत आहे. विराट कोहलीला नेट्समध्ये सराव करताना पाहून अनेकांनी तो दिल्लीविरोधात मोठी खेळी करेल असे म्हटलेय.  






विराट कोहलीची दमदार खेळी - 
आयपीएलच्या सोळाव्या हंगामात विराट कोहली दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे. विराट कोहलीने आतापर्यंत तीन डावात फलंदाजी केली. त्याने 82 च्या सरासरीने 147.75 च्या स्ट्राईक रेटने 164 धावा चोपल्या आहेत. तीन डावात विराट कोहलीने दोन अर्धशतके झळकवली आहेत. यामध्ये 9 षटकार आणि 13 चौकार लगावले आहेत.


चांगल्या सुरुवातीनंतर आरसीबी ढेपाळली - 


आरसीबीने मुंबईचा पराभव करत आयपीएलच्या सोळाव्या हंगामात दणक्यात सुरुवात केली. मुंबईच्या विरोधात आरसीबीने आठ विकेटने पराभव केला. त्यानंतर आरीसीबीला लागोपाठ दोन पराभवाचा सामना करावा लागला. कोलकाताने 81 धावांनी पराभव केली. त्यानंतर लखनौकडून अटीतटीच्या लढतीत एका धावेने हरवले. 


दिल्लीचा संघ बेंगलोरमध्ये दाखल झाला आहे. यावेळी दिल्लाचा मुख्य कोच रिकी पाँटिंग आणि विराट कोहली यांची भेट झाली. यावेळी रिकी पाँटिंग याने मुलाला विराट कोहलीसोबत भेट घालून दिली. विराट कोहलीला भेटल्यानंतर पाँटिंगचा मुलगा खूश दिसत होता. 






आणखी वाचा 


हे यापूर्वी कधीच घडले नाही! मैदानावरील पंचाच्या निर्णयावर मैदानाबाहेर आक्षेप, अश्विनला मोठा दंड