Karun Nair joins LSG : दुखापतीमुळे केएल राहुल आयपीएलला मुकणार आहे. राहुलने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आज अधिकृत माहिती दिली. लखनौने केएल राहुल याच्या जागी धाकड फलंदाजाला ताफ्यात घेतलेय. करुण नायर (Karun Nair to replace KL Rahul) याला लखनौने केएल राहुलच्या जागी संघात घेतलेय. करुण नायर याच्या नावावर कसोटीत एकाच डावात 300 धावा कण्याचा विक्रम आहे.  आरसीबीबरोबर इकाना स्टेडिअमवर केएल राहुल (KL Rahul ruled out of TATA IPL 2023 due to injury) याला दुखापत झाली होती. 


करुण नायर याला 50 लाख रुपयांमध्ये लखनौने आपल्या संघात घेतलेय. करुण नायर याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 76 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 1496 धावा केल्या आहेत. 2023 लिलावत करुण नायर अनसोल्ड राहिला होता. नायरची बेस प्राईझ 50 लाख रुपये होती. आता दुखापतग्रस्त राहुलमुळे नायरला संधी मिळाली आहे. याआधी नायर दिल्ली आणि राजस्थान संघाचा सदस्य होता. 2022 मध्ये नायर राजस्थान संघामध्ये होता. त्याला 1.4 कोटी रुपयांमध्ये राजस्थानने घेतले होते. पण त्याला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे त्याला रिलिज करण्यात आले होते.  आयपीएलमध्ये करुण नायरच्या नावावर 1496 धावा आहेत. यादमर्यान त्याने 10 अर्धशतके झळकावली आहेत. सेच 161 चौकार आणि 39 ष
षटकार लगावले आहेत.






केएल राहुल दुखापतग्रस्त, इमोशन पोस्ट लिहिली 


लखनौ आणि आरसीबी यांच्यातील सामन्यादरम्यान फिल्डिंग करताना केएल राहुल याला दुखापत झाली. राहुलची दुखापत गंभीर असल्याचे म्हटले जातेय. राहुल सध्या आराम करत आहे. आरसीबीविरोधात राहुल फलंदाजीसाठी मैदानात उतरला पण एकही धाव घेतली नाही. आता राहुल याने आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपमधून माघार घेतली आहे. काळजीपूर्वक विचार केल्यानंतर आणि वैद्यकीय सल्लामसलत केल्यानंतर, मांडीवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काही दिवसात शस्त्रक्रिया होईल. त्यानंतर फिटनेसवर लक्ष केंद्रित करेल. उर्वरित आयपीएल आणि पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये खेळू शकणार नाही. 






जयदेव उनादकटही दुखापतग्रस्त -


आयपीएलमध्ये खेळताना जयदेवला दुखापत झाली आहे. लखनौ संघाकडून खेळणाऱ्या जयदेवला सरावारम्यान खांद्याला दुखापत झाली. जयदेवची दुखापत गंभीर असल्याचे बोलले जातेय.