IPL 2023: आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला सुरुवात होऊन महिनाभरचा कालावधी संपलाय.. आयपीएल स्पर्धा जसजशी उत्तार्धाकडे जातेय तसतसा रोमांच वाढत जातोय. आतापर्यंत अनेक सामने अखेरच्या षटकांपर्यंत रगंलेत.. 126 धावा यशस्वी वाचवण्यातही संघाला यश आलेय तर 200 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलागही करण्यात आला. सलग पाच षटकारही पाहिले.. यंदाच्या आयपीएल हंगामात अनेक नवीन खेळाडूही चमकले... आयपीएल स्पर्धा पुढे जातेय तसे प्लेऑफमध्ये कोणते संघ जातील, याची चर्चा सुरु आहे. रेल्वे, कट्टायवर, ऑफिसात अन् सोशल मीडियावरही प्लेऑफमध्ये कोण पोहचणार याबाबत चर्चा सुरु आहे. सध्या दाहाही संघाचे प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता आहे. प्रत्येक संघ त्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे दहा संघामधून प्लेऑफमधील चार संघ कोणते असतील याचा अंदाज बांधणे सध्या तरी कठीण दिसेतय. पण भारतीय संघाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंह याने प्लेऑफमध्ये जाणाऱ्या चार संघाची नावे सांगितली आहेत. या चारपैकी एका संघाला जेतेपज मिळेल, असेही भाकीत भज्जी ने केलेय.
गुजरात, चेन्नई, मुंबई आणि आरसीबी हे चार संघ प्लेऑफमध्ये पोहोचतील, असा दावा हरभजन सिंह याने केला आहे. मुंबई इंडियन्स सध्या शर्यतीत पिछाडीवर आहे, पण येत्या काही आठवड्यात राजस्थान रॉयल्सला मागे टाकून प्ले ऑफमध्ये प्रवेश करेल, असं हरभजन सिंह याने सांगितले. राजस्थान रॉयल्सचा संघ देखील शर्यतीत राहील, पण शेवटी बाकीचे संघ राजस्थानचा पराभव करतील, असं हरभजन सिंहने सांगितले. भज्जी याने गुजरात,चेन्नई, मुंबई आणि आरसीबी या चार संघाची प्लेऑफसाठी निवड केली आहे. 28 मे रोजी आपल्याला यंदाच्या आयपीएलमधील विजेता संघ मिळेल..
गुजरात संघ पहिल्या स्थानावर -
गुणतालिकेत पहिल्या स्थानावर गतविजेता गुजरात संघ आहे. गुजरात संघाने नऊपैकी सहा सामने जिंकले असून संघाकडे 12 गुण आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर लखनौ आहे. लखनौ संघाने 10 पैकी पाच सामने जिंकले असून संघाकडे 11 गुण आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चेन्नई संघानेही 10 पैकी पाच सामने जिंकले असून संघाकडे 11 गुण आहेत. चौथ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्स आहे. राजस्थान संघाने आतापर्यंत नऊ सामन्यांपैकी पाच सामने जिंकले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स हे संघ गुणतालिकेत अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत. बंगळुरुकडे 10 गुण असून संघाने नऊपैकी पाच सामने जिंकले आहेत. मुंबई इंडियन्स सहाव्या क्रमांकावर आहे. संघाने आतापर्यंतच्या नऊ सामन्यांपैकी पाच सामने जिंकले आहेत. पंजाब संघ 10 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. तर, आठव्या क्रमांकावर असलेल्या कोलकाता संघाकडे 10 गुण आहेत. कोलकाता संघाने दहा पैकी चार सामने जिंकले आहे. हैदराबाद संघ सहा गुणांसह नवव्या स्थानावर असून संघाने नऊपैकी फक्त तीन सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत सर्वात शेवटी दिल्ली कॅपिटल्स असून संघाकडे सहा गुण आहेत. दिल्लीने आतापर्यंतच्या नऊपैकी फक्त तीन सामन्यांत विजय मिळवला आहे.