Indian Premier League, Jofra Archer : आयपीएल 2023 साठी सर्वच दहा संघांनी आपली तयारी सुरु केली आहे. बीसीसीआयने आयपीएलचे वेळापत्रक जारी केले, त्यानंतर या तयारीला आणखी वेग आला. 31 मार्चपासून आयपीएलचा रनसंग्राम सुरु होणार आहे. त्याआधीच जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे खेळणार नसल्याचे समोर आल्यामुळे मुंबईच्या चिंतेत वाढ झाली होती. पण मुंबईसाठी आज दिलासादायक बातमी आली आहे. इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आयपीएलच्या पू्र्ण हंगामासाठी उपल्बध असणार आहे. बुमराह नसल्यामुळे चिंतेत पडलेल्या मुंबईच्या चाहत्यांसाठी ही मोठी खूशखबर आहे.


मुंबईला मोठा दिलासा-
आयपीएल 2023 सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्ससाठी मोठा दिलासा मिळाला आहे.  यंदाच्या संपूर्ण आयपीएल सत्रात जोफ्रा आर्चर खेळताना दिसणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डने याला दुजोरा दिला आहे. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आयपीएल खेळणार नसल्याचा मुंबईला मोठा फटका बसला होता. मुंबईच्या अडचणी वाढल्या होत्या, पण जोफ्रा आर्चरच्या आगमनामुळे मुंबईचा वेगवान मारा बळकट झाला आहे. जोफ्रा आर्चरच्या वर्कलोडची सर्व जबाबदारी इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडेच असेल.  


बुमराह आयपीएलमधून बाहेर -
आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्ससाठी जसप्रीत बुमराह महत्वाचा सदस्य आहे. जसप्रीत बुमराह बाहेर गेल्यामुळे मुंबईची गोलंदाजी कमकुवत जाणवत होती. बुमराहची रिप्लेसमेंट शोधणं मुंबईसाठी कठीण होतं. पण जोफ्रा आर्चर संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध असल्यामुळे मुंबईचं टेन्शन कमी झाले आहे. बुमराहच्या अनुपस्थितीत जोफ्रा आर्चर वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळेल. गतवर्षी आयपीएलच्या लिलावात मुंबई इंडियन्सने जोफ्रा आर्चरला खरेदी केले होते. पण दुखापतीमुळे गेल्या हंगामात आर्चर आयपीएलला मुकला होता. आता या हंगामात तो मुंबईकडून खेळणार आहे.  






मुंबई इंडियन्सचं वेळापत्रक 
दोन एप्रिल  vs आरसीबी - अवे
आठ एप्रिल  vs चेन्नई - होम
11 एप्रिल  vs दिल्ली - अवे
16 एप्रिल vs कोलकाता - होम
18 एप्रिल vs हैदराबाद - अवे
22 एप्रिल vs पंजाब - होम
25 एप्रिल vs गुजरात - अवे
30 एप्रिल vs राजस्थान - होम
3 मे vs पंजाब - अवे
6 मे vs चेन्नई - अवे
9 मे vs आरसीबी - होम
12 मे vs गुजरात - होम
16 मे vs लखनौ - अवे
21 मे vs हैदराबाद - होम




मुंबई इंडियन्सचा संघ (Mumbai Indians Squad)
रोहित शर्मा (कर्णधार), डेवॉल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, अर्जुन तेंडुलकर, ऋतिक शोकिन, जोफ्रा आर्चर, मोहम्मद अरशद खान, तिलक वर्मा, रमनदीप सिंह, टिम डेव्हिड, जसप्रीत बुमराह, कॅमरून ग्रीन, जाये रिचर्ड्सन, कुमार कार्तिकेय, ट्रिस्टन स्टब्स, पीयुष चावला, आकाश मधवाल, शम्स मुलानी, जेसन बेहरनडॉर्फ, नेहल वधेरा, विष्णू विनोद, राघव गोयल.