Jaydev Unadkat Ruled Out of IPL 2023 : लखनौला आरसीबीकडून पराभवाचा धक्का मिळालाच... त्या धक्क्यानंतर लखनौला आणखी दोन धक्के बसले आहेत. कर्णधार केएल राहुल दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकणार आहे. त्याशिवाय वेगवान गोलंदाज जयदेव उनादकट याने दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. रिपोर्ट्सनुसार, सरावादरम्यान नेट्समध्ये जयदेव उनादकट याच्या खांद्याला दुखापत झाली आहे. दुखापत गंभीर असल्यामुळेच जयदेव याने आयपीएलमधून माघार घेतली आहे.
पुढील महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होत आहे. टीम इंडियाच्या संघात उनादकट याचाही समावेश आहे. उनादकट याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी आयपीएलमधून माघार घेतल्याचे बोलले जातेय. उनादकट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलपूर्वी फिट होईल, असा विश्वास व्यक्त केला जातोय. आतापर्यंत उनादकट याच्या दुखापतीबाबत कोणताही माहिती समोर आलेली नाही. त्याची दुखापत किती गंभीर आहे, याबाबतही कोणताही माहिती समोर आलेली नाही. यंदाच्या आयपीएल हंगामात उनादकट याने फक्त तीन सामने खेळले आहेत. यामध्ये त्याला एकही विकेट घेता आलेली नाही. पण याआधी त्याने दमदार कामगिरी केली आहे.
नेट्समध्ये गोलंदाजीचा सराव कराताना जयदेवला दुखापत झाली. रिपोर्ट्सनुसार, गोलंदाजी करताना जयदेव खाली पडला अन् खांद्याला झटका बसल्याचे बोलले जातेय. आयपीएलने जयदेवचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याशिवाय क्रिकइन्फोच्या रिपोर्ट्सनुसार, जयदेव उनादकट याने आयपीएलमधून माघार घेतली आहे. एनसीएमध्ये जयदेव पोहचला असून दुखापतीवर काम करत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपआधी तंदुरुस्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
2010 मध्ये केलं होतं कसोटी पदार्पण
जयदेव उनाडकटने डिसेंबर 2010 मध्ये कसोटी पदार्पण केलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटीत त्याला प्रथमच कसोटी जर्सी घालण्याची संधी मिळाली. मात्र, या कसोटीत त्याची कामगिरी अत्यंत खराब झाली. 26 षटके टाकल्यानंतर आणि 100 हून अधिक धावा केल्यानंतर त्याला एकही विकेट मिळाली नाही. या पदार्पणाच्या कसोटीत त्याच्यासोबत सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, एमएस धोनी आणि वीरेंद्र सेहवाग हे दिग्गज होते.
विकेट किती?
जयदेवने दोन कसोटीत तीन विकेट घेतल्या आहेत. त्याशिवाय सात एकदिवसीय सामन्यात त्याने 8 विकेट घेतल्या आहेत. तर 10 टी 20 सामन्यात त्याला 14 विकेट मिळाल्या आहेत. आयपीएलमध्ये 94 सामन्यात 91 विकेट घेतल्या आहेत.
माझी शेवटची IPL हे तुम्ही ठरवलं, मी नाही; 2024 मध्येही खेळण्याचे धोनीचे स्पष्ट संकेत
IPL 2023 : विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात तेव्हा काय झाले बोलणं?