KL Rahul Ruled Out of IPL 2023 : लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघाला मोठा झटका बसला आहे. कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आयपीएलमधून (IPL 2023) बाहेर पडणार हे जवळजवळ निश्चित झालं आहे. आयपीएल 2023 मध्ये आता लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) कर्णधार केएल राहुल मैदानावर दिसण्याची शक्यता फार कमी आहे. दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडणार हे निश्चित झालं आहे. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल आरसीबीविरुद्धच्या सामन्यादरम्यान गंभीर जखमी झाला होता. आता तो आयपीएलच्या संपूर्ण हंगामातून बाहेर जाणार हे जवळजवळ निश्चित झालं आहे.


KL Rahul Ruled Out : लखनौ सुपर जायंट्स संघाला मोठा झटका


लखनौ सुपर जायंट्स संघाला आता केएल राहुलशिवाय उरलेले सामने खेळण्यासाठी तयार राहावं लागेल. लखनौ संघाचा कर्णधार सध्या सुरू असलेल्या आयपीएल 2023 हंगामातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. राहुल लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्यात खेळणार नसल्याची माहिती सुत्रांकडून समोर येत आहे. चेन्नई विरुद्धचा सामना तो खेळणार नसून फक्त बेंचवर बसून पाहणार आहे. त्यानंतर गुरुवारी राहुल मुंबईला रवाना होईल. तिथे त्याच्या दुखापतीसंदर्भातील इतर टेस्ट केल्या जाणार आहे.


KL Rahul Ruled Out : कर्णधार केएल राहुल आयपीएलमधून बाहेर?


इकाना स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यादरम्यान चेंडूच्या मागे धावताना राहुलच्या उजव्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर तो मैदानातून बाहेर पडला. त्याच्या दुखापतीबाबत अद्याप कोणतीही अपडेट अधिकृतरित्या समोर आलेली नाही. पण सुत्रांच्या माहितीनुसार, केएल राहुल यंदाच्या आयपीएलमधून बाहेर पडणार असल्याचं सांगितलं जात आहे.


WTC अंतिम सामन्याआधी टीम इंडियाची चिंता वाढली


दरम्यान, केएल राहुलच्या दुखापतीमुळे टीम इंडियाची चिंताही वाढली आहे. पुढील महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडणार आहे. केएल राहुल टीम इंडियाचा भाग आहे. जर, त्याची दुखापत गंभीर असेल, तर तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. शिवाय टीम इंडियाला त्याच्याजागी दुसऱ्या खेळाडूला खेळवण्याबाबत विचार करावा लागेल.