Jasprit Bumrah in IPL : मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह नरेंद्र मोदी स्टेडिअमवर स्पॉट झालाय. मुंबईच्या सपोर्टसाठी बुमराह अहमदाबादमध्ये पोहचलाय. दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला मुकला आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. पण त्याला सध्या आराम करण्याचा सल्ला दिलाय. मुंबईच्या सपोर्टसाठी जसप्रीत बुमराह मैदानात उतरला आहे. याआधी दिल्लीच्या सपोर्टसाठी ऋषभ पंत मैदानात आला होता. आता जसप्रीत बुमराह याला मैदानात स्पॉट करण्यात आले आहे. 


मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जसप्रीत बुमराह याला गंभीर दुखापत झालेली आहे, त्यामुळे तो मागील सहा महिन्यापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. जसप्रीत बुमराह याच्यावर नुकतीच न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रिया पार पडली. सध्या तो फिटनेसवर काम करत आहे. अशातच तो मुंबईच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी तो स्टेडिअममध्ये आला आहे. जसप्रीत बुमराहचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.


जसप्रीत बुमराह याची अनुपस्थितीत मुंबईची गोलंदाजी कमकुवत जाणवत आहे. जोफ्रा आर्चर याच्याकडून अद्याप हवा तसा परफॉर्मन्स मिळाला नाही. आर्चर आजच्याही सामन्यात दुखापतीमुळे बाहेर आहे. अशातच अनुभवी गोलंदाजाची कमी मुंबईच्या संघाला जाणवत आहे. रायली मेरिडेथ आणि जेसन बेहनड्रॉफ या दोन्ही गोंलदाजाकडून अद्याप प्रभावी कामगिरी झालेली नाही. पीयुष चावलाचा अपवाद वगळता अद्याप एकाही गोलंदाजाला प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. अष्टपैलू कॅमरुन ग्रीनही गोलंदाजीत प्रभावी मारा करताना दिसत नाही. अशात मुंबईला जसप्रीत बुमराह याची कमी प्रकर्षाने जाणवत आहे. 










मुंबईने नाणेफेक जिंकली 


अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गुजरात आणि मुंबई या दोन संघामध्ये लढत होत आहे.  रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.  रोहित शर्माने मुंबईच्या संघात काही बदल केले आहेत. जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे आजच्या सामन्याला उपलब्ध नाही. ऋतिक शौकिन आजच्या सामन्याला मुकला आहे. त्याच्याजागी कुमार कार्तिकेय याला प्लेईंग ११ मध्ये स्थान दिलेय 


 नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?



अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गोलंदाज आणि फलंदाजामध्ये तुल्यबळ समान पाहायला मिळतो. खेळपट्टी गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हींसाठी पूरक आहे. सीमारेषा दूर असल्यामुळे फलंदाजांना षटकार-चौकार मारताना मेहनत घ्यावी लागते. तसेच चौकार षटकाराच्या नादात विकेट जाण्याची शक्यता असते. या मैदानावर एकेरी दुहेरी धावांचे तेवढेच महत्व आहे. या मैदानावर कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. प्रथम फलंदाजी करणारा संघ मोठी धावसंख्या उभारु शकतो. या मैदानावर 180 पर्यंत धावांच्या लक्ष्याचा पाठलाग होऊ शकतो.  नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक मानली जाते. पण सुरुवातीच्या षटकात येथे वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळते. अचूक टप्प्यावर मारा करणाऱ्या गोलंदाजाला यश मिळतेच.