SRH vs DC IPL 2023 : अटीतटीच्या लढतीत दिल्लीने हैदराबादचा सात धावांनी पराभव केला. दिल्लीच्या विजयानंतर डेविड वॉर्नर उत्साहित दिसून आला... त्याचे सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरला. हैदराबादवरील विजयाचा आनंद वॉर्नरसाठी काही काळच राहिला.. कारण स्ले ओव्हररेटमुळे आयपीएलच्या कमिटीने डेविड वॉर्नर याला आर्थिक दंड ठोठावला आहे. 


डेविड वॉर्नर कधीकाळी हैदराबाद संघाचा कर्णधार होता... पण फ्रेंचायझी आणि डेविड वॉर्नर यांच्यातील मतभेद वाढले.. त्यानंतर वॉर्नर याला मॅनेजमेंटने संघातून बाहेरचा रस्ता दाखवलाय. हैदराबादमध्ये डेविड वॉर्नर याला चाहत्यांकडून खूप प्रेमही मिळाले. काल झालेल्या सामन्यातही दिसून आले. हैदराबादचा पराभव केल्यानंतर डेविड वॉर्नर याचा आनंद गगणात मावेनासा झाला होता. त्याने केलेले सेलिब्रेशन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. पण आयपीएलच्या समितीने वॉर्नर याला स्लो ओव्हररेटमुळे 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. 


दिल्ली आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान डेविड वॉर्नर  स्लो ओवर रेटप्रकरणी दोषी आढळला. गोलंदाजीवेळी दिल्ली संघाला जास्त वेळ लागला... निर्धारित वेळेत षटकांचा कोटा पूर्ण केला नाही. त्यामुळे आयपीएलच्या कमिटीने डेविड वॉर्नर याला 12 लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला. दरम्यान, विराट कोहली आणि संजू सॅमसन यांना स्लो ओव्हररेटमुळे आधीच दंड बसला आहे. निर्धारित वेळात षटके पूर्ण करण्याचे आव्हान आयपीएलच्या कर्णधारासमोर आहे. यामध्ये काही कर्णधारांना अपयश येत आहे. 






 






दिल्लीचा सलग दुसरा विजय - 


DC vs SRH, Match Highlights : अटतटीच्या लढतीत दिल्लीने हैदराबादचा सात धावांनी पराभव केला. सात सामन्यात दिल्लीचा हा दुसरा विजय होय. तर हैदराबादचा सात सामन्यात हा पाचवा पराभव झाला आहे. हैदराबाद आणि दिल्ली या गुणतालिकेतील तळाच्या दोन्ही संघाचे आयपीएलमधील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. या दोन्ही संघाला आयपीएलमध्ये आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी उर्वरित सर्व सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. दिल्लीने दिलेल्या 145 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा  संघ सहा विकेटच्या मोबद्लयात 137 धावांपर्यंत मजल मारु शकला. दिल्लीकडून मुकेश कुमार याने अखेरचं षटक जबरदस्त टाकले. अखेरच्या षटकात हैदराबादला विजयासाठी 13 धावांची गरज होती, मुकेश कुमार याने या षटकात एकही चौकार न देता दिल्लीला विजय मिळवून दिला.