IPL 2023, GT vs MI: शुभमन गिल याचे दमदार अर्धशतक आणि डेविड मिलर आणि अभिनव मनोहर यांची वादळी फलंदाजीच्या जोरावर गुजरातने निर्धारित 20 षटकात 6 विकेटच्या मोबद्लयात 207 धावांपर्यंत मजल मारली. गिल याने 56 धावांची खेळी केली. तर डेविड मिलर याने 46 तर मनोहर याने झटपट 42 धावांची खेळी केली. अखेरीस राहुल तेवातिया याने तीन षटकार लगावत गुजरातची धावसंख्या 200 च्या पुढे पोहचली. मुंबईला विजयासाठी 208 धावांचे आव्हान आहे.


शुभमन गिलचे अर्धशतक - 


सलामी फलंदाज शुभमन गिल याने दमदार फलंदाजी केली. एका बाजूला विकेट पडत असताना गिल याने दुसऱ्या बाजूने दमदार फलंदाजी केली. गिल याने अवघ्या 30 चेंडूत अर्धशतक झळकावले. शुभमन गिल याने सुरुवातीपासून मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. शुभमन गिल याने 34 चेंडूत 56 धावांची खेळी केली. या खेळीत गिल याने सात चौकार आणि एक षटकार लगावला. 


हार्दिक फ्लॉप - 


नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातची सुरुवात खराब झाली. युवा अर्जुन तेंडुलकर याने अनुभवी वृद्धीमान साहा याला स्वस्तात बाद केले. साहा याने फक्त चार धावांचे योगदान दिले. कर्णधार हार्दिक पांड्या याला मोठी खेळी करता आली नाही. पांड्या 14 चेंडूत 13 धावा काढून बाद झाला. पीयुष चावला याने हार्दिक पांड्याला बाद केले. विजय शंकर यालाही मोठी खेळी करता आली नाही. विजय शंकर याने 16 चेंडूत 19 धावांची खेळी केली. या खेळीत विजय शंकर याने एक षटकार आणि एक चौकार लगावला. 


मिलर-मनोहरचा फटकेबाजी - 


चार विकेट झटपट पडल्यानंतर अभिनव मनोहर आणि डेविड मिलर यांनी मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.  या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 35 चेंडूत 71 धावांची  भागिदारी केली. यामध्ये मिलर याने 14 चेंडूत 28 धावांचे योगदान दिले. तर अभिनव मनोहर याने 21 चेंडूत 42 धावांचे योगदान दिलेय. मिलर आणि मनोहर यांच्या फटकेबाजीमुळे गुजरातचा संघाने विराट धावसंख्या उभारली. अभिनव मनोहर याने 21 चेंडूत 42 धावांची आक्रमक खेळी केली. या खेळीत त्याने तीन षटकार आणि तीन चौकार लगावले. 


मिलरचा फिनिशिंग टच - 


डेविड मिलर याने आक्रमक फलंदाजी करत गुजरातच्या डावाला आकार दिला. मिलर याने आधी मनोहर याच्यासोबत गुजरातच्या डावाला आकार दिला. त्यानंतर राहुल तेवातिया याच्यासोबत फिनिशिंग टच दिला. डेविड मिलर याने 22 चेंडूत 46 धावांचे योगदान दिले. मिलर याने या खेळीत चार षटकार आणि दोन चौकार लगावले. अवघ्या चार धावांसाठी मिलरचे अर्धशतक हुकले. राहुल तेवातिया याने अवघ्या पाच चेंडूत नाबाद 20 धावांचे योगदान दिले. यामध्ये तेवातिया याने तीन षटकार लगावले. तेवातिया आणि मिलर यांनी सहाव्या विकेटसाठी 10 चेंडूत 33 धावांची भागिदारी केली. 


कॅमरुन ग्रीन महागडा, पीयुषचा भेदक मारा -


कॅमरुन ग्रीन सर्वात महागाडा गोलंदाज ठरला. ग्रीन याला दोन षटकात 39 धावा चोपल्या. ग्रीन याला एकही विकेट घेता आली नाही, पण धावा 20 च्या सरासरीने खर्च केल्या. रायली मेरिडेथ याने चार षटकात 49 धावा खर्च केल्या. मेरिडेथ याला एक विकेट मिळाली. कुमार कार्तिकेय याने चार षटात 39 धावा खर्च करत एक विकेट घेतली. अर्जुन तेंडुलक याने दोन षटकात 9 धावा देत एक विकेट घेतली. जेसन बेहनड्रॉफ यानेही 12 पेक्षा जास्त सरासरीने धावा खर्च केल्या. पीयुष चावला याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. चावलाने 4 षटकात 34 धावा खर्च करत दोन विकेट घेतल्या.