GT vs MI, IPL 2023 : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गुजरात आणि मुंबई या दोन संघामध्ये लढत होत आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. घरच्या मैदानावर हार्दिक पांड्याचा गुजरात संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. हार्दिक पांड्या याआधी मुंबई संघाचा महत्वाचा सदस्य होता. पण मुंबईने पांड्याला रिलीज केले. त्यानंतर गुजरात संघाने हार्दिकला कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. हार्दिक पांड्याला याला मुंबई संघाबद्दल बऱ्याच गोष्टी माहित आहेत. त्यामुळे आजचा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. 


रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.  रोहित शर्माने मुंबईच्या संघात काही बदल केले आहेत. जोप्रा आर्चर दुखापतीमुळे आजच्या सामन्याला उपलब्ध नाही. ऋतिक शौकिन आजच्या सामन्याला मुकला आहे. त्याच्याजागी कुमार कार्तिकेय याला प्लेईंग ११ मध्ये स्थान दिलेय. गतविजेत्या गुजरात संघामध्येही एक बदल कऱण्यात आला आहे.  पाहूयात दोन्ही संघाची प्लेईंग 11


Gujarat Titans: गुजरातचे 11 शिलेदार कोण?


वृद्धीमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, विजय शंकर, डेविड मिलर, राहुल तेवातिया, राशिद खान, मोहम्मद शामी, नूर अहमद, मोहित शर्मा 
Wriddhiman Saha (wk), Shubman Gill, Hardik Pandya (capt), Abhinav Manohar, Vijay Shankar, David Miller, Rahul Tewatia, Rashid Khan, Mohammed Shami, Noor Ahmad, Mohit Sharma


Mumbai Indians XI: मुंबई इंडियन्समध्ये कोणते 11 खेळाडू ?


रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), कॅमरुन ग्रीन,  सूर्यकुमार यादव, टीम डेविड, नेहाल वढेरा, रायली मेरीडथ, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, पीयुष चावला, जेसन बेहनड्रॉफ
Rohit Sharma (capt), Ishan Kishan (wk), Cameron Green, Suryakumar Yadav, Tim David, Nehal Wadhera, Riley Meredith, Arjun Tendulkar, Kumar Kartikeya, Piyush Chawla, Jason Behrendorff


Narendra Modi Stadium Pitch Report : नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?



अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गोलंदाज आणि फलंदाजामध्ये तुल्यबळ समान पाहायला मिळतो. खेळपट्टी गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हींसाठी पूरक आहे. सीमारेषा दूर असल्यामुळे फलंदाजांना षटकार-चौकार मारताना मेहनत घ्यावी लागते. तसेच चौकार षटकाराच्या नादात विकेट जाण्याची शक्यता असते. या मैदानावर एकेरी दुहेरी धावांचे तेवढेच महत्व आहे. या मैदानावर कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. प्रथम फलंदाजी करणारा संघ मोठी धावसंख्या उभारु शकतो. या मैदानावर 180 पर्यंत धावांच्या लक्ष्याचा पाठलाग होऊ शकतो.  नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक मानली जाते. पण सुरुवातीच्या षटकात येथे वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळते. अचूक टप्प्यावर मारा करणाऱ्या गोलंदाजाला यश मिळतेच.