DC vs GT, 1 Innings Highlight: मोहम्मद शामी आणि राशिद खान यांच्या फिरकीपुढे दिल्लीच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. दिल्लीने निर्धारित 20 षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात 162 धावा केल्या आहेत. दिल्लीकडून अक्षर पटेल याने दमदार फलंदाजी केली. अक्षर पटेलच्या फलंदाजीच्या जोरावर दिल्लीने 162 धावांपर्यंत मजल मारली. गुजरातला विजयासाठी 163 धावांचे आव्हान आहे.
अक्षर पटेलचा फिनिशिंग टच -
आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर युवा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याने दमदार प्रदर्शन केले. अक्षर पटेल याने दिल्लीला जबरदस्त फिनिशिंग टच दिला. अक्षर पटेल याने धावांचा पाऊस पाडला. अक्षर पटेल याने तळाच्या फलंदाजांना सोबत घेत दिल्लीची धावसंख्या वाढवली. अक्षर पटेल याच्या खेळीमुळे दिल्लीचा संघ १५० धावसंख्या ओलाडंता आली. अक्षर पटेल याने २२ चेंडूत ३६ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान अक्षर पटेल याने तीन षटकार आणि दोन चौकार लगावले.
वॉर्नर-सर्फराजचा संघर्ष -
दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर आणि सर्फराज खान संघर्ष करताना दिसले. दोघांनाही चांगली सुरुवात मिळाली होती. पण मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. डेविड वॉर्नर ३२ चेंडूत ३७ धावा काढून बाद झाला. तर सर्फराज खान याने ३४ चेंडूत ३० धावांची खेळी केली. या दोन्ही फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली होती, पण मोठी खेळी करण्यात अपयश आले.
दिल्लीची फलंदाजी ढासळली -
गुजरातच्या भेदक गोलंदाजीसमोर दिल्लीची फलंदाजी ढासळली. पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, रीले रुसे यांना लौकिसास साजेशी खेळी करता आली नाही. पृथ्वी शॉ अवघ्या सात धावा काढून बाद झाला. तर रुसोला खातेही उघडता आले नाही. मिचेल मार्श अवघ्या चार धावा काढून बाद झाला. लागोपाठ विकेट पडल्यामुळे दिल्लीची धावसंखेला खीळ बसली. अमन खान यालाही संधीचे सोने करता आले नाही. अमन खान आठ धावांवर बाद झाला.
गुजरातची भेदक गोलंदाजी -
सुरुवातीपासूनच गुजरातच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा केला. मोहम्मद शामी, अल्जारी जोसेफ आणि राशिद खान यांनी भेदक मारा केली. मोहम्मद शामी याने तीन विकेट घेतल्या. राशिद खान यानेही तीन विकेट घेतल्या. अल्जारी जोसेफ याने दोन विकेट घेतल्या.
दिल्ली-गुजरात संघात बदल -
गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातच्या संघात एक महत्वाचा बदल करण्यात आला. केन विल्यमसन दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेबाहेर गेलाय. त्याच्या जागी गुजरातने डेविड मिलर याला प्लेईंग ११ मध्ये स्थान दिले. तर दिल्लीच्या संघात दोन बदल करण्यात आले. दिल्लीने एनरिक नॉर्किया आणि अभिषेक पोरेल यांना प्लेईंग ११ मध्ये संधी दिली. दिल्लीने रॉमन पॉवेल याला प्लेईंग ११ मधून वगळलेय.
दिल्लीच्या सपोर्टसाठी पंत आला स्टेडिअममध्ये -
दिल्लीचा नियमीत कर्णधार ऋषभ पंत याने मंगळवारी मैदानात हजेरी लावली. दिल्ली आणि गुजरात यांच्यादरम्यान अरुण जेटली स्टेडिअमवर सामना सुरु आहे. या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. दिल्लीचे चाहते आपल्या नियमीत कर्णधाराला मिस करत आहेत. प्रत्येक सामन्यात पंतचे फोटो अथवा पोस्टर दिसतात. आज दिल्लीतील सामन्याला ऋषभ पंत याने हजेरी लावली आहे. पंतचा स्टेडिअममध्ये बसलेला फोटो व्हायरल झाला आहे. ऋषभ पंत दिल्लीच्या सपोर्टसाठी मैदानात आला आहे. 2022 मध्ये भीषण अपघात झाल्यामुळे ऋषभ पंत काही दिवसांपासून क्रिकेटपासून दूर आहे. पुढील काही महिने त्याला क्रिकेट खेळता येणार नाही. पण दिल्लीच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी ऋषभ पंत याने आज स्टेडिअममध्ये हजेरी लावली. दुखापतीनंतरही पंत संघाला सपोर्ट करण्यासाठी आला आहे. सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय आहे.