Dasun Shanaka replaces Williamson in Gujarat Titans squad IPL 2023 : दुखापतग्रस्त केन विल्यमसन याची रिप्लेसमेंट गुजरातला मिळाली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातने श्रीलंकेच्या दासुन शनाका याला ताफ्यात घेतले आहे. चेन्नईविरोधात झालेल्या सामन्यात केन विल्यमसन दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर तो आयपीएलमधून बाहेर गेलाय. आता त्याच्या जागी दासुन शनाकाला संघात घेतले आहे.
दासुन शनाका श्रीलंकेचा टी20 कर्णधार आहे. तो बॅटिंग ऑलराऊंडर आहे. त्याने आतापर्यंत 181 टी 20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 3702 धावा चोपल्या आहेत. त्याशिवाय 59 विकेट घेतल्या आहेत. दासुन शनाका पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळणार आहे.
विल्यमसनला दुखापत -
Kane Williamson ruled out of IPL 2023 हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाने आयपीएलच्या 16 व्या हंगामाची सुरुवात विजयाने केली. पण पहिल्याच सामन्यात गुजरातला मोठा धक्का बसला. अनुभवी केन विल्यमसन दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएलमधून बाहेर गेला. चेन्नईविरोधातील सामन्यात फिल्डिंग करताना विल्यमसनच्या पायाला दुखापत झाली होती. दोन खेळाडूंनी विल्यमसनला मैदानाबाहेर नेहले होते. विल्यमसनच्या पायाचे एक्स रे आणि स्कॅन करण्यात आले, त्यानंतर तो काही दिवस क्रिकेट खेळू शकत नसल्याचे समोर आले आहे. ऋतुराज गायकवाड याचा झेल घेण्याच्या प्रयत्नात विल्यमसन दुखापतग्रस्त झाला होता. फिल्डिंग करताना 13 व्या षटकात जोशुआ लिटिलच्या चेंडूवर विल्यमसनला दुखापत झाली. जोशुआच्या चेंडूवर ऋतुराज गायकवाड याने मोठा फटका मारला, त्याचवेळी सीमारेषावर असलेल्या विल्यमसन याने झेल घेण्याचा प्रयत्न केला. विल्यमसन जवळपास तीन सेकंद हवेत झेपावत चेंडू आतामध्ये टाकला. पण जमीनीवर पडताना त्याच्या पायाला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर असून विल्यमसनला काही काळ क्रिकेटपासून दूर राहावे लागणार आहे. त्यामुळे विल्यमसन आयपीएलमधून बाहेर पडलाय. त्याच्याजागी श्रीलंकेच्या दासुन शनाकाला संधी दिली आहे.