Abishek Porel IPL Debut, Delhi Capitals vs Gujarat Gaints IPL 2023 : गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर दिल्लीचा संघ प्रथम फलंदाजी करत आहे. दिल्लीने गुजरातविरोधात आपल्या संघात दोन महत्वाचे बदल केले आहे. दिल्लीने पश्चिम बंगालच्या अभिषेक पोरेल याला प्लेईंग ११ मध्ये संधी दिली आहे. पोरेल याला पंतच्या जागी संघात घेतले आहे. पोरेल फलंदाजी आणि विकेटकिपिंगमध्ये पंतची कमी भरणार का? असा प्रश्न उपस्थित आहे. वीस वर्षीय अभिषेक पोरेल हा भारताच्या अंडर १९ टीमचा सदस्य होता. पोरेलकडे आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव कमी आहे, पण या खेळाडूमध्ये प्रतिभा प्रचंड प्रमाणात आहे.
Abhishek Porel Delhi Capitals: कोण आहे अभिषेक पोरेल? (who is Abishek Porel)
अभिषेक पोरेल (Abishek Porel) हा बंगालचा (Bangal) युवा यष्टिरक्षक फलंदाज आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालचे प्रतिनिधित्व करतो. यष्टिरक्षणाव्यतिरिक्त तो डावखुरा फलंदाज आहे. तो गेल्या वर्षी भारताच्या अंडर-19 विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता. 2022 मध्येच त्याने देशांतर्गत क्रिकेटमधील सर्व फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. त्याने रणजी करंडक पदार्पणात बडोद्याविरुद्ध अर्धशतक झळकावले होते. रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्येही त्याने अर्धशतक झळकावले होते. तो अतिशय प्रतिभावान खेळाडू मानला जातो. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग याने ऋषभ पंतच्या (Rishabh pant) रिप्लेसमेंटसाठी काही यष्टीरक्षकांच्या टेस्ट घेतल्या होत्या. त्यात अभिषेक पोरेलचाही (Abishek Porel) समावेश होता. त्यानंतर त्याचा दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) संघात समावेश करण्यात आला.
Abhishek Porel Delhi Capitals: अभिषेक पोरेलची क्रिकेट कारकीर्द
अभिषेक पोरेल (Abishek Porel) याने आतापर्यंत 16 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ज्यात त्याने 695 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 6 अर्धशतके झळकावली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 73 धावा आहे. अभिषेकने 3 लिस्ट ए सामन्यांमध्येही भाग घेतला आहे. या सामन्यांच्या एका डावात त्याला फलंदाजीची संधी मिळाली. ज्यात त्याने 54 धावा केल्या. याशिवाय त्याने 3 टी-20 सामने देखील खेळले आहेत. ज्यात तो 22 धावा करण्यात यशस्वी झाला. अ