IPL 2023 Records : आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील सातव्या सामन्याला सुरुवात झाली आहे. दिल्ली आणि गुजरात यांच्यामध्ये सध्या रंगतदार लढत सुरु आहे. चेन्नईने सोमवारी लखनौला मात दिली. या सामन्यानंतर अनेक विक्रम झाले..सोमवारपर्यंत झालेल्या सामन्यात अनेक विक्रम झाले. धोनीने पाच हजार धावांचा पल्ला पार केला. आतापर्यंत गोलंदाजी आणि फलंदाजीत कोण कोण आघाडीवर आहे.. पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप कुणाच्या डोक्यावर आहे... याबाबत उत्सुकता आहे. पाहूयत कोण आहे पर्पल कॅपचा मानकरी अन् कुणाच्या डोक्यावर ऑरेंज कॅप आहे... तसेच आघाडीच्या पाच गोलंदाजाबद्दल आणि फलंदाजाबद्दल जाणून घेऊयात.. 


ऑरेंज कॅप ऋतुराजच्या डोक्यावर, रेसमध्ये कोण कोण कोण


पहिल्या दोन सामन्यात ऋतुराज गायकवाड याने विस्फोटक खेळी केली. दोन्ही सामन्यात ऋतुराजने अर्धशथके लगावली आहेत. पहिल्या सामन्यात ऋतुराजने ९२ धावांची खेळी केली होती. त्यानंतर लखनौविरोधातही ऋतुराजने अर्धशतक झळकावले होते. ऋतुराज गायकवाड याने दोन सामन्यात १४९ धावा केल्या आहेत. सध्या ऋतुराज गायकवाड पुन्हा एकदा ऑरेंज कॅप जिंकू शकतो. २०२१ मध्ये ऋतुराजने ऑऱेंज कॅप जिंकली होती. सध्या ऑरेंज कॅप ऋतुराजच्या डोक्यावर आहे. 


दुसऱ्या क्रमांकावर लखनौचा काइल मायर्स आहे.. त्याने दोन्ही सामन्यात अर्धशतके झळकावली होती. दोन सामन्यात मायर्स याने १२६ धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर मुंबईचा तिलक वर्मा आहे. तिलक वर्माने पहिल्याच सामन्यात ८४ धावांची खेळी केली होती.  या यादीत विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने मुंबईविरोधात ८२ धावांची खेळी केली होती. तर पाचव्या क्रमांकावर आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस आहे. डु प्लेसिसने पहिल्याच डावात ७३ धावांची खेळी केली होती. या खेळाडूंशिवाय गुजरातचा सलामी फलंदाज शुभमन गिलही या स्पर्धेत आहे. त्याने पहिल्या सामन्यात प्रभावी फलंदाजी केली होती. या स्पर्धेत सध्या तो सहाव्या क्रमांकावर आहे..पण तो दिल्लीविरोधातील सामन्यात मोठी खेळी करु शकतो. 


पर्पल कॅप लखनौच्या गोलंदाजाकडे, स्पर्धेत कोण कोण....


लखनौचा वेगवान गोलंदाज मार्क वूड याच्या डोक्यावर सध्या पर्पल कॅप आहे. मार्क वूड याने दोन सामन्यात आठ विकेट घेतल्या आहेत. तो पर्पल कॅपच्या स्पर्धेत आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर लखनौचाच रवि बिश्नोई आहे. बिश्नोईने आतापर्यंत पाच विकेट घेतल्या आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर राजस्थानचा युजवेंद्र चहल आहे. चहलने एका डावात पाच विकेट घेतल्या आहेत.  चेन्नई सुपर किंग्सचा मोईन अलीही या स्पर्धेत आहे. मोईन अलीने दोन सामन्यातील एका डावात गोलंदाजी करताना चार विकेट घेतल्या आहेत.  पंजाबच्या अर्शदीप याने एका सामन्यात तीन विकेट घेतल्या आहेत. तोही पर्पल कॅपच्या स्पर्धेत येऊ शकतो.