IPL Final 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा विजेता मिळण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. गतविजेता गुजरात आणि चार वेळचा विजेता चेन्नई यांच्यामध्ये आयपीएल 2023 ची फायनल रंगणार आहे. यंदाच्या हंगामाची सुरुवातही याच दोन संघामध्ये झाली होती. रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हार्दिक पांड्या आणि धोनी यांच्यामध्ये लढत होणार आहे. दोन्ही संघातील हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.  भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघामध्ये अनुभवी आणि युवा खेळाडूंचा भरणा आहे. कागदोपत्री दोन्ही संघ तुल्यबळ दिसत आहेत.


पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरातचा पराभव


पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सला पराभवाचा सामना करावा लागला. शेवटच्या सामन्यात गुजरातला चेन्नई सुपर किंग्स संघाचं आव्हान होतं. गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांच्यातील 87 धावांच्या सलामीच्या भागीदारीमुळे चेन्नई (CSK) संघाने 20 षटकांत सात गडी गमावून 172 धावा केल्या. गुजरातने (GT) फलंदाजीत काही बदल केले, पण याचा त्यांना फायदा झाला नाही. शुभमन गिलने 38 चेंडूत 42 धावा केल्या पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. गुजरात संघ 20 षटकात केवळ 157 धावा करून सर्व बाद झाला. चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्स विरुद्धचा सामना 15 धावांनी खेळ जिंकला.


GT vs CSK : पिच रिपोर्ट  


धोनीच्या नेतृत्वात चेन्नईचा संघ मैदानात उतरणार आहे तर हार्दिक पांड्या गुजरात संघाचे नेतृत्व करत आहे. दोन्ही संघातील सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. दोन्ही संघाकडे अनेक दर्जेदार खेळाडूंचा भरणा आहे.अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गोलंदाज आणि फलंदाजामध्ये तुल्यबळ सामना पाहायला मिळतो. खेळपट्टी गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी पूरक आहे. सीमारेषा दूर असल्यामुळे फलंदाजांना षटकार-चौकार मारताना मेहनत घ्यावी लागते. तसेच चौकार षटकाराच्या नादात विकेट जाण्याची शक्यता असते. या मैदानावर एकेरी दुहेरी धावांचे तेवढेच महत्व आहे. या मैदानावर कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतात.. प्रथम फलंदाजी करणारा संघ मोठी धावसंख्या उभारु शकतो.. या मैदानावर 180 पर्यंत धावांच्या लक्षाचा पाठलाग होऊ शकतो.  नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक मानली जाते... पण सुरुवातीच्या षटकात येथे वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळते. अचूक टप्प्यावर मारा करणाऱ्या गोलंदाजाला यश मिळतेच. 


हेड टू हेड


गुजरात संघाचे आयपीएलमधील दुसरे वर्ष आहे. पहिल्याच वर्षी गुजरात संघाने जेतेपदाला गवसणी घातली होती. 2022 मध्ये पदार्पणातच गुजरात संघाने आयपीएलवर नाव कोरले. गेल्यावर्षी गुजरात आणि चेन्नई यांच्यात दोन सामने रंगले होते. दोन्ही सामन्यात गुजरात संघाने बाजी मारली होती. यंदाही गुजरात आणि चेन्नई दोन वेळा आमने सामने आले होते. यामध्ये दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. आतापर्यंत दोन्ही संघामध्ये चार सामने झाले आहेत. यामध्ये गुजरातने तीन तर चेन्नईने एका सामन्यात विजय मिळवलाय. 


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.


चेन्नईची संभावित प्लेईंग 11


ऋतुराज गायकवाड, डेवोन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, शिवम दुबे, मोइन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कप्तान और विकेटकीपर), दीपक चाहर, तुषार देशपांडे आणि महेश तीक्ष्णा


गुजरात टायटन्स संभावित प्लेईंग 11 :


वृद्धीमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी


आयपीएल 2023 साठी चेन्नई सुपर किंग्सचे संपूर्ण  स्क्वाड -


एमएस धोनी (कर्णधार), डेवोन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापति, मोइन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, , 
महिश तिक्ष्णा मिशेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथीशा पथिराना, सिमर देशपांडे, दीपक चाहर, प्रशांत सोळंकी 


आयपीएल 2023 साठी गुजरात टायटन्सचे संपूर्ण स्क्वाड


हार्दिक पंड्या(कर्णधार), राशिद खान, राहुल तेवतिया, शुभमन गिल, मोहम्मद शमी, शिवम मावी, जोशुआ लिटिल, यश दयाल, डेविड मिलर, आर साई किशोर, अभिनव सदरंगानी, अल्जारी जोसेफ, मॅथ्यू वेड, दासुन शनाका, रिद्धिमान साहा, जयंत यादव , विजय शंकर, केएस भरत, ओडियन स्मिथ, मोहित शर्मा, नूर अहमद, उर्विल पटेल, प्रदीप सांगवान, दर्शन नालकंडे, साई सुदर्शन  







आणखी वाचा :


CSK IPL Records: धोनीच्या चेन्नईचा बोलबाला! CSK चे 5 विक्रम माहित आहेत का ?


गुजरात की चेन्नई कोण मारणार बाजी? 2008 पासून कोणत्या संघाने चषक उंचावला, वाचा एका क्लिकवर


IPL 2023 : चेन्नईच्या कोणत्या किंगची सुपर कामगिरी, पाहा संपूर्ण आकेडावारी एका क्लिकवर


आयपीएलमध्ये चेन्नईच किंग्स, सर्वाधिक फायनल खेळणारा संघ, पाहा CSK ची आतापर्यंतची कामगिरी


GT in IPL 2023: हार्दिकची टोळी दुसऱ्यांदा फायनलमध्ये, टायटन्सपुढे किंग्सचे आव्हान, पाहा गतविजेत्याचा यंदाचा प्रवास


IPL मध्ये पैशांचा पाऊस, विजेत्याला 20 कोटी, मुंबईला 7 कोटी; पर्पल-ऑरेंज कॅप जिंकणाऱ्याला किती रुपये? 


पर्पल-ऑरेंज कॅप टायटन्सकडेच, हार्दिकच्या टोळीत कुणाची कामगिरी कशी, वाचा एका क्लिकवर




WTC विजेत्यावर कोट्यवधीची उधळण, पण IPL विजेत्यापुढे ही रक्कम किरकोळ