5 Biggest Records Made By Chennai Super Kings CSK In The IPL History : गतविजेता गुजरात आणि चार वेळचा विजेता चेन्नई यांच्यामध्ये आयपीएल 2023 ची फायनल रंगणार आहे. यंदाच्या हंगामाची सुरुवातही याच दोन संघामध्ये झाली होती. रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हार्दिक पांड्या आणि धोनी यांच्यामध्ये लढत होणार आहे. दोन्ही संघातील हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.  भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघामध्ये अनुभवी आणि युवा खेळाडूंचा भरणा आहे. कागदोपत्री दोन्ही संघ तुल्यबळ दिसत आहेत.


आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा विजेता मिळण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. चेन्नई आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघापैकी एक आहे.. एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने आतापर्यंत अनेक विक्रम केले आहेत. त्यापैकी मोजक्या 5 विक्रमाबद्दल जाणून घेऊयात.., जे आयपीएलच्या इतिहासात इतर कोणत्याही संघाला करता आले नाहीत. याबाबत जाणून घेऊयात..


01. सर्वाधिक प्ले-ऑफ सामने :
धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाने आतापर्यंत सर्वाधिक प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. चेन्नईचा संघ 2 वर्षे खेळला नाही. 14 हंगामापैकी 12 वेळा चेन्नईचा संघ प्ले-ऑफ फेरीत पोहोचला आहे. केवळ 2020 आणि 2022 मध्ये चेन्नईचा संघ प्ले-ऑफ फेरीपर्यंत पोहोचू शकला नाही. इतर कोणत्याही संघाला ही कामगिरी करता आलेली नाही. त्यापाठोपाठ मुंबईचा संघ १० वेळा प्ले-ऑफ फेरीत पोहोचला आहे.


02. सर्वाधिक वेळा नेतृत्व :
चेन्नई संघाचा कर्णधार धोनी आयपीएल मालिकेत सर्वाधिक सामन्यांचे नेतृत्व करणारा खेळाडू होण्याचा मान मिळवणार आहे. 2008 पासून त्याने 219 सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व केले आहे. याव्यतिरिक्त, त्याने 2016 मध्ये 14 सामन्यांमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे नेतृत्व केले. मात्र, पुण्याने त्यापैकी केवळ 5 सामने जिंकले.


03. कमी स्कोअर विजय:
2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयपीएल मालिकेत चेन्नई संघाने केवळ 116 धावा करत आपला यशस्वी बचाव केला होता. त्या सामन्यात पंजाबचा डाव अवघ्या 92 धावांत संपुष्टात आणला होता. चेन्नईने 24 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. आयपीएलमधला हा विक्रम आजही कायम आहे.


04. सर्वाधिक फायनल खेळणारा संघ:
आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा चेन्नईने अंतिम फेरी गाठली आहे.  चेन्नईच्या संघाने आतापर्यंत खेळलेल्या 14 हंगामात 10 वेळा आयपीएल मालिकेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. प्ले-ऑफमध्ये आगेकूच केल्यानंतर, चेन्नईने 2009 आणि 2014 मध्येच अंतिम फेरी गाठता आळी नाही.  आतापर्यंत आयपीएल इतिहासात चेन्नईने 9 वेळा अंतिम फेरी गाठली आहे, परंतु 5 वेळा अपयशी आले. चेन्नईला चार वेळा जेतेपदावर नाव कोरता आले.


05. एका हंगामात सर्वाधिक विकेट :
आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक विकेट घेण्याचा मान चेन्नईचा माजी खेळाडू ड्वेन ब्राव्हो याच्या नावावर आहे.  2013 च्या आयपीएल हंगामात 18 सामन्यात ब्राव्होने  32 विकेट घेतल्या.  ब्राव्होच्या या विक्रमाची बरोबरी आरसीबीच्या हर्षल पटेल याने २०२१ मध्ये केली, पण त्याला विक्रम मोडता आला नाही.  






आणखी वाचा : 


गुजरात की चेन्नई कोण मारणार बाजी? 2008 पासून कोणत्या संघाने चषक उंचावला, वाचा एका क्लिकवर


IPL 2023 : चेन्नईच्या कोणत्या किंगची सुपर कामगिरी, पाहा संपूर्ण आकेडावारी एका क्लिकवर


आयपीएलमध्ये चेन्नईच किंग्स, सर्वाधिक फायनल खेळणारा संघ, पाहा CSK ची आतापर्यंतची कामगिरी


GT in IPL 2023: हार्दिकची टोळी दुसऱ्यांदा फायनलमध्ये, टायटन्सपुढे किंग्सचे आव्हान, पाहा गतविजेत्याचा यंदाचा प्रवास


IPL मध्ये पैशांचा पाऊस, विजेत्याला 20 कोटी, मुंबईला 7 कोटी; पर्पल-ऑरेंज कॅप जिंकणाऱ्याला किती रुपये? 


पर्पल-ऑरेंज कॅप टायटन्सकडेच, हार्दिकच्या टोळीत कुणाची कामगिरी कशी, वाचा एका क्लिकवर




WTC विजेत्यावर कोट्यवधीची उधळण, पण IPL विजेत्यापुढे ही रक्कम किरकोळ