DC vs SRH IPL 2023 Match 34 : आयपीएल (IPL 2023) आज 24 एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)  यांच्यात रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. आयपीएल 2023 लीगमधील हा 34 वा सामना असेल. आज दिल्लीतील राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Cricket Stadium, Hyderabad) संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघ आयपीएलच्या पॉईंट्स टेबलच्या तळाशी असल्याने, ते स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना विजयासाठी प्रयत्न करतील.


IPL 2023 SRH vs DC : दिल्ली आणि हैदराबाद आमने-सामने


आयपीएल 2023 गुणतालिकेत आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यांतून दोन विजयांनंतर हैदराबाद नवव्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे, डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील संघ सहा सामन्यांपैकी एकाकी विजयासह शेवटच्या म्हणजे दहाव्या स्थानावर आहे. हैदराबाद संघाने मागील सामना गमावला. त्यानंतर संघाला चेन्नई सुपर किंग्जकडून सात गडी राखून पराभव पत्करावा लागला. दिल्ली संघाने अखेरच्या सामन्यात कोलकाताचा 4 गडी राखून पराभव केला.


Rajiv Gandhi International Stadium Pitch Report : राजीव गांधी स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?


हैदराबाद आणि राजस्थान यांच्यातील सामना राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअम (Rajiv Gandhi International Stadium) वर होणार आहे. ही खेळपट्टी पूर्णपणे सपाट असून गोलंदाजांना चांगला बाउंस देते. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना चांगला स्विंग आणि बाउन्स देते. पहिल्या डावात चांगली फलंदाजी होण्याची शक्यता आहे.


DC vs RR Playing 11: दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11


DC Playing 11 : दिल्ली संभाव्य प्लेईंग 11


डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, मनीष पांडे, अक्षर पटेल, अमन हकीम खान, ललित यादव, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा, मुकेश कुमार.


SRH Playing 11 : हैदराबाद संभाव्य प्लेईंग 11


हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


SRH vs DC Match Preview : दिल्ली विरुद्ध हैदराबाद लढत, कुणाचं पारड जड? हेड टू हेड आकडेवारी पाहा...