IPL 2023, CSK : आयपीएलच्या (IPL) आगामी 2023 च्या हंगामाला काही दिवसांत सुरुवात होणार आहे. सर्वत्र हळूहळू आयपीएलचा फिव्हर चढू लागला आहे. दरम्यान आयपीएलच्या 16व्या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात जायंट्स यांच्यात होणार आहे. दरम्यान सीएसकेचा कॅप्टन एमएस धोनी (MS Dhoni) एका वेगळ्याच अंदाजात दिसून आला. काही दिवसांपूर्वी धोनीचा सराव करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यानंतर आता धोनी चक्क स्टेडियमधील खुर्च्या रंगवताना दिसून येत आहे. सीएसकेने त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर हा व्हिडीओ अपलोड केला असून “𝑫𝒆𝒇𝒊𝒏𝒊𝒕𝒆𝒍𝒚 𝒍𝒐𝒐𝒌𝒊𝒏𝒈 𝒀𝒆𝒍𝒍𝒐𝒗𝒆” असं कॅप्शन दिलं आहे. पिवळ्या रंगातच या खुर्च्या रंगवल्या जात असून असं कॅप्शन दिलं गेलं आहे. धोनीच हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहतेही यावर तुफान कमेंट्स करत असून पोस्टवर लाईक्सचाही पाऊस पडत आहे.


पाहा VIDEO-






चेन्नई सुपर किंग्ज अजूनही धोनीच्या उत्तराधिकारीच्या शोधात  


महेंद्रसिंग धोनीच्या जागी चेन्नई सुपर किंग्ज कोणत्या खेळाडूकडे कर्णधारपद सोपवणार याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही, गेल्या मोसमात रवींद्र जाडेजाकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली असली तरी संघाची खराब कामगिरी लक्षात घेऊन धोनीने कर्णधारपदाची जबाबदारी पुन्हा स्वीकारली होती. हंगामाच्या मध्यभागी पुन्हा संघाचं कर्णधारपद त्यानं घेतलं होतं. दरम्यान चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला आगामी आयपीएल हंगामातील पहिला सामना गतविजेत्या गुजरात टायटन्सविरुद्ध 31 मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळायचा आहे. त्याचवेळी, या मोसमात जुन्या फॉर्मेटनुसार सामने खेळले जात असल्याने, CSK ला चेपॉकमध्ये बऱ्याच कालावधीनंतर सामना खेळण्याची संधी मिळणार आहे, ज्यामध्ये संघ 3 एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळेल.


धोनी घेऊ शकतो आयपीएलमधूनही निवृत्ती


महेंद्र सिंग धोनीने 2020 मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. आता असं मानलं जात आहे की 2023 मध्ये आयपीएलची 16 वी आवृत्ती त्याची शेवटची असेल, त्यानंतर तो आयपीएलमधूनही निवृत्त होईल. चेन्नईच्या चाहत्यांसमोर त्याला आयपीएलमधील शेवटचा सामना खेळायला आवडेल, असं धोनीने आपल्या आधीच्या वक्तव्यात स्पष्ट केलं होतं. अशा परिस्थितीत या मोसमानंतर तो क्रिकेटच्या या सर्वात मोठ्या लीगला अलविदा करेल अशी शक्यता आहे. मात्र धोनीकडून याबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही.


हे देखील वाचा-