IPL 2023 News : आयपीएलचा आगामी हंगाम अर्थात 16 वा सीझन काही दिवसांतच सुरु होत आहे. 31 मार्चपासून रंगणाऱ्या या स्पर्धेत जगभरातील स्टार खेळाडू सामिल होणार आहेत. दरम्यान जागतिक क्रिकेटमधील स्टार खेळाडू स्टीव्ह स्मिथ हा आता पुन्हा एकदा आयपीएलमध्ये सहभागी होणार आहे. ही माहिती त्याने स्वत: ट्वीट करत दिली असून नेमका स्मिथ कोणत्या संघात खेळणार? की कॉमेन्टेटर म्हणून जबाबदारी सांभाळणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.


तर स्मिथने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो म्हटला आहे की, "नमस्ते इंडिया. माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी खास बातमी आहे. मी आयपीएल 2023 मध्ये सामील होत आहे. होय, तुम्ही ऐकलं ते बरोबर आहे. मी भारतातील एका दमदार  आणि उत्साही संघात सामील होत आहे.” दरम्यान या व्हिडीओनंतर विविध चर्चा सध्या होत असून काहीजण स्मिथ हा कॉमेन्ट्री करण्यासाठी आयपीएलमध्ये सहभागी होणार अशी चर्चा असून काहीजण तो केकेआरमध्ये सहभागी होईल अशी शक्यता आहे. केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आयपीएलला मुकणार हे जवळपास निश्चित झाल्याने आता त्यांना नवा कर्णधार लागणार आहे. स्मिथ अशामध्ये संघासोबत सामिल होण्याचीही शक्यता आहे.


पाह स्मिथचा VIDEO-






आयपीएल 2023 नवीन नियम


बीसीसीआयने या आयपीएल हंगामात काही नवीन नियम केले आहेत. या नियमामुळे संघाच्या पराभव आणि विजयात मोठा फरक पडू शकतो. या नवीन नियमानुसार, नाणेफेकीच्या वेळी संघाला त्यांच्या प्लेइंग इलेव्हनसह 4 पर्यायी खेळाडूंची नावे द्यावी लागतील. त्या 4 खेळाडूंपैकी कोणत्याही एका खेळाडूचा कर्णधार सामन्यादरम्यान स्पेशल खेळाडू म्हणून वापर करू शकतो. ज्याला 'इम्पॅक्ट प्लेअर' असं म्हटलं जात असून हा खेळाडू म्हणून, कर्णधार 4 पर्यायी खेळाडूंपैकी कोणत्याही एका खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधील कोणत्याही एका खेळाडूसह बदलू शकतो. रिटायर्ड हर्ट प्लेअरच्या जागी 'इम्पॅक्ट प्लेअर'ही बॅटिंगला येऊ शकतो. दोन्ही संघ प्रत्येक सामन्यात इम्पॅक्ट खेळाडू वापरू शकतात. जर संघात 4 परदेशी खेळाडू खेळत असतील, तर विदेशी खेळाडूचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर करता येणार नाही.


IPL 2023 च्या प्रत्येक डावात दोन DRS 



  • आयपीएलमध्ये खेळाडूंना वाइड आणि नो-बॉलचाही रिव्ह्यू घेता येणार आहे.

  • महिला प्रीमियर लीग ही अशी पहिलीच स्पर्धा आहे, ज्यामध्ये प्रथमच वाईड आणि नो बॉलसाठी डीआरएस घेण्याची व्यवस्था आली आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सची हरमनप्रीत कौर हा नवा नियम वापरणारी पहिली खेळाडू ठरली आहे.

  • झेल बाद झाल्यावर, फलंदाज अर्धी खेळपट्टी ओलांडली की नाही, नवीन फलंदाज स्ट्राइक घेतील. शेवटचा चेंडू असेल तर तो स्ट्राइक घेणार नाही.


हे देखील वाचा-