IPL 2023 : आयपीएल 2023 (IPL) सुरू होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा रजत पाटीदार घोट्याच्या दुखापतीमुळे यंदाच्या हंगामाच्या काही सामन्यांना मुकू शकतो. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसली तरी ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, रजत पाटीदार आयपीएलच्या पहिल्या हाल्फला तरी मुकणार आहे, हे जवळपास निश्चित आहे. सध्या पाटीदार बंगळुरू येथील एनसीएमध्ये दुखापतीतून सावरत आहे. त्याला पुढील तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानंतर एमआरआय स्कॅननंतर तो आयपीएलच्या दुसऱ्या भागात खेळू शकेल की नाही हे कळेल. दुसरीकडे रजतचा फोटो पोस्ट करून आरसीबीने तो झपाट्याने फिट होत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 


कोण करणार तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी?


मागील आयपीएल हंगामात पाटीदार आरसीबीसाठी सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक होता. त्याने 7 डावात 56 च्या सरासरीने आणि 153 च्या स्ट्राईक रेटने 333 धावा केल्या. पाटीदारने गेल्या मोसमात असारिबीसाठी नंबर-3 वर फलंदाजी केली. या हंगामात असारिबी संघात नसल्यास नंबर-3 वर कोण फलंदाजी करू शकतो, याबद्दलचे पर्याय जाणून घेऊ...


विराट कोहली


या यादीत पहिला क्रमांक विराट कोहलीचा आहे. जर फाफ डू प्लेसिसने अनुज रावत किंवा सुयश प्रभुदेशाई यांच्यासोबत फलंदाजीची सुरुवात केली तर विराट कोहली त्याच्या आवडत्या स्थानावर म्हणजेच क्रमांक-3 वर खेळू शकतो.


महिपाल लोमरोर


आरसीबी डावखुऱ्या भारतीय फलंदाजाला महिपालच्या रूपाने क्रमांक-3वर खेळण्याची संधी देऊ शकते. या स्थितीत विराट फाफसोबत सलामीला उतरू शकतो.


सुयश प्रभुदेशाई


या खेळाडूने गेल्या वर्षी सीएसकेविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. 6व्या क्रमांकावर येताना सुयशने 18 चेंडूत 34 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सुयशने शानदार फलंदाजी केली. अशा परिस्थितीत विराटने सलामी दिली तर आरसीबी या खेळाडूला नंबर-3 वरही आजमावू शकते.


रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संभाव्य प्लेइंग इलेव्हन : फाफ डुप्लेसी (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर/मायकेल ब्रेसवेल, हर्षल पटेल, वनिंदू हसरंगा, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज


IPL 2023 चे काही नवीन नियम


निर्धारित वेळेबाहेरील प्रत्येक षटकासाठी 30-यार्ड वर्तुळाबाहेर फक्त चार क्षेत्ररक्षकांना परवानगी आहे.
यष्टिरक्षक आणि क्षेत्ररक्षकाच्या चूकीच्या हालचालींमुळे डेड बॉल आणि 5 पेनल्टी रन्स मिळतील.
नाणेफेक झाल्यानंतर संघांनी प्लेईंग इलेव्हनची घोषणा करायची आहे.
फ्रँचायझी 15-खेळाडूंच्या टीम शीटचे नाव देतील, ज्यामध्ये 4 पर्यायांपैकी एक इम्पॅक्ट खेळाडू असेल.


हे देखील वाचा-