IPL 2023 Chennai Super Kings Schedule : बीसीसीआयनं आयपीएलच्या 16 व्या हंगामाचं वेळापत्रक जारी केले आहे.  31 मार्च ते 28 मे यादरम्यान आयपीएलचा थरार रंगणार आहे. गतविजेते गुजरात आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर उद्घाटनाचा सामना होणार आहे.  धोनीच्या चेन्नई संघाच्या  14 सामन्याचं वेळापत्रक समोर आले आहे. चेन्नई घरच्या मैदानावर सात सामने खेळणार आहे, तर सात सामने प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर खेळणार आहे. 


IPL 2023 Groups:


दहा संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. पहिल्या ग्रुपमध्ये मुंबई, राज्यस्थान, केकेआर, दिल्ली आणि लखनौ संघाचा सहभाग आहे. तर ब गटामध्ये चेन्नई, पंजाब, हैदराबाद, आरसीबी आणि गुजरात या संघाचा समावेश आहे.  


यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई संघाचं वेळापत्रक, कुणाबरोबर अन् कधी होणार सामना -


31 मार्च 2023- चेन्नई सुपर किंग्स vs गुजरात टायटंस- नरेन्द्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
2 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vs लखनऊ सुपर जॉइंट्स- चेपक स्टेडियम, चेन्नई
8 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vs मुंबई इंडियन्स, वानखेडे स्टेडियम, मुंबई
12 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vsराजस्थान रॉयल्स, चेपक स्टेडियम, चेन्नई
17 एप्रिल  2023- चेन्नई सुपर किंग्स vs रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगलोर


21 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vsसनराइजर्स हैदराबाद, चेपक स्टेडियम, चेन्नई
23 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vs कोलकाता नाइट राइडर्स, ईडेन गार्डेन स्टेडियम, कोलकाता
27 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vs राजस्थान रॉयल्स, जयपुर
30 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vs पंजाब किंग्स, चेपक स्टेडियम, चेन्नई
4 मे 2023- चेन्नई सुपर किंग्स vs लखनऊ सुपर जॉइंट्स, इकाना स्टेडियम, लखनऊ


6 मे 2023- चेन्नई सुपर किंग्स vs मुंबई इंडियन्स, चेपक स्टेडियम, चेन्नई
10 मे 2023- चेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स, चेपक स्टेडियम, चेन्नई
14 मे 2023- चेन्नई सुपर किंग्स vs कोलकाता नाइट राइडर्स, चेपक स्टेडियम, चेन्नई
20 मे 2023- चेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स, अरूण जेटली स्टेडियम, दिल्ली






कोणत्या शहरात होणार आयपीएलचे सामने
- अहमदाबाद
- मोहाली
- लखनौ
- हैदराबाद
- बेंगलोर
- चेन्नई
- दिल्ली
- कोलकाता
- जयपूर
- मुंबई
- गुवाहाटी
- धर्मशाला


चेन्नईच्या ताफ्यात कोण कोणते खेळाडू ?
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, डेव्हॉन कॉन्वे, मोईन अली, रुतुराज गायकवाड, शिवम दुबे, अंबाती रायुडू, ड्वेन प्रिटोरियस, महिश तिक्ष्णा, प्रशांत सोलंकी, दीपक चाहर, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंह, राजवर्धन हंगेरगेकर, मिचेल सँटनर, मथिशा पाथिराना, सुभ्रांशु सेनापती,  तुषार देशपांडे, बेन स्टोक्स, भगत वर्मा, अजय जाधव मंडल, काईल जेमिसन, निशांत सिंधू, शेख रशीद आणि अजिंक्य रहाणे.


लिलावात चेन्नईच्या संघानं विकत घेतलेले खेळाडू -
बेन स्टोक्स (16.25 कोटी), भगत वर्मा (20 लाख), अजय जादव मंडल (20 लाख), कायल जेमिसन (एक कोटी), निशांत सिंधू (60 लाख), शेख रशीद (20 लाख), अजिंक्य रहाणे (50 लाख).


धोनीनंतर कर्णधार कोण?
महेंद्रसिंग धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्जची कमान गायकवाडकडे सोपवली जाणार की स्टोक्सकडे, असा याची चर्चा आहे. चेन्नई सुपर किंग्जचा आगामी कर्णधारपदाच्या शर्यतीत युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड आघाडीवर आहे. याचे कारण तो एक भारतीय खेळाडू आहे आणि त्यामुळे तो कॅप्टन असताना संघाच्या कॉम्बिनेशनमध्ये फारशी अडचण येणार नाही. दुसरीकडे, गायकवाड याला कर्णधारपदाचा चांगला अनुभव आहे, तो डॉमेस्टीक क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचा कर्णधार असून महाराष्ट्र संघाची कामगिरीही चांगली असल्याचं दिसून आलं आहे. कर्णधार असताना त्याने फलंदाजीतही चांगली कामगिरी केली असल्याने त्याला कर्णधारपदाचा एक तगडा उमेदवार मानलं जात आहे.


आणखी वाचा :


IPL 2023 : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स कुणा कुणासोबत भिडणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक


IPL 2023 Schedule : आयपीएलचं वेळापत्रक आलं, गुजरात आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना