IPL 2023 Mumbai Indians : आयपीएलच्या 16 व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर झाले आहे. 31 मार्च ते 28 मे या दरम्यान आयपीएलचा थरार रंगणार आहे. गतविजेते गुजरात आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. आपल्या मुंबई इंडियन्सचा पहिला सामना दोन एप्रिल रोजी आरसीबीविरोधात होणार आहे. मुंबई इंडियन्सच्या 14 सामन्याचं वेळापत्रक समोर आले आहे. मुंबई इंडियन्स घरच्या वानखेडे मैदानावर सात सामने खेळणार आहे, तर सात सामने प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर खेळणार आहे.
IPL 2023 Groups:
दहा संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. पहिल्या ग्रुपमध्ये मुंबई, राज्यस्थान, दिल्ली आणि लखनौ संघाचा सहभाग आहे. तर ब गटामध्ये चेन्नई, पंजाब, हैदराबाद, आरसीबी आणि गुजरात या संघाचा समावेश आहे. मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघाला वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ठेवण्यात आले आहे. मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये प्रत्येकी दोन सामने होणार आहेत.
मुंबई इंडियन्सचं वेळापत्रक
दोन एप्रिल vs आरसीबी - अवे
आठ एप्रिल vs चेन्नई - होम
11 एप्रिल vs दिल्ली - अवे
16 एप्रिल vs कोलकाता - होम
18 एप्रिल vs हैदराबाद - अवे
22 एप्रिल vs पंजाब - होम
25 एप्रिल vs गुजरात - अवे
30 एप्रिल vs राजस्थान - होम
3 मे vs पंजाब - अवे
6 मे vs चेन्नई - अवे
9 मे vs आरसीबी - होम
12 मे vs गुजरात - होम
16 मे vs लखनौ - अवे
21 मे vs हैदराबाद - होम
कोणत्या शहरात होणार आयपीएलचे सामने
- अहमदाबाद
- मोहाली
- लखनौ
- हैदराबाद
- बेंगलोर
- चेन्नई
- दिल्ली
- कोलकाता
- जयपूर
- मुंबई
- गुवाहाटी
- धर्मशाला
नुकत्याच झालेल्या लिलावात मुंबईनं विकत घेतलेल्या खेळाडूंची यादी -
कॅमरुन ग्रीन (17.5 कोटी), नेहाल वढेरा (20 लाख), शम्स मुलानी (20 लाख), विष्णु विनोद (20 लाख), डुआन जेंसन (20 लाख), पीयूष चावला (50 लाख), झाई रिचर्डसन (1.5 कोटी), राघव गोयल (20 लाख).
मुंबई इंडियन्सचा संघ (Mumbai Indians Squad)
रोहित शर्मा (कर्णधार), डेवॉल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, अर्जुन तेंडुलकर, ऋतिक शोकिन, जोफ्रा आर्चर, मोहम्मद अरशद खान, तिलक वर्मा, रमनदीप सिंह, टिम डेव्हिड, जसप्रीत बुमराह, कॅमरून ग्रीन, जाये रिचर्ड्सन, कुमार कार्तिकेय, ट्रिस्टन स्टब्स, पीयुष चावला, आकाश मधवाल, शम्स मुलानी, जेसन बेहरनडॉर्फ, नेहल वधेरा, विष्णू विनोद, राघव गोयल.
आणखी वाचा :
IPL 2023 Schedule : आयपीएलचं वेळापत्रक आलं, गुजरात आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना