IPL 2023 Match 1, CSK vs GT : आजपासून आयपीएल 2023 (Indian Premier League 2023) ला सुरुवात होता आहे. आज 'कॅप्टन कूल' (Captain Cool) धोनीच्या (Dhoni) चेन्नई सूपर किंग्सचा (Chennai Super Kings) सामना हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात गतविजेत्या गुजरात टायटन्ससोबत (Gujarat Titans) रंगणार आहे. आज आयपीएलच्या (IPL 2023) हंगामातील पहिल्याच सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, या मॅचच्या आधी चेन्नईच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. मॅचआधी धोनीच्या संघाच्या अडचणी वाढल्याचं चित्र दिसत आहे.
IPL 2023, CSK vs GT : धोनी पहिल्याच सामन्यातून बाहेर?
'थाला' धोनीला (MS Dhoni) सराव सत्रात दुखापत झाल्याची महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 41 वर्षाच्या महेंद्र सिंग धोनीला चेन्नईमध्ये सराव सत्रावेळी डाव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. धोनीने गुरुवारी संघाच्या मोटेरा स्टेडिअमवरील सराव सत्रात सहभागी झाला नव्हता. चेन्नई संघाचे सीईओ काशी विश्वनाथन यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितलं की, कर्णधार धोनी 100 टक्के फिट असून तो आजचा सामना खेळेल.
IPL 2023, CSK vs GT :चेन्नईचा आघाडीचा गोलंदाज आयपीएलबाहेर
दरम्यान, आयपीएल सुरु होण्यापूर्वीच चेन्नई संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएलला मुकणार आहे. दीपक चाहरच्या अनुपस्थितीत मुकेश चौधरीने (Mukesh Choudhary) तुफान गोलंदाजी केली होती. पण दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएलमधून मुकेश चौधरी बाहेर बसणार आहे. पाठदुखीमुळे मुकेश चौधरी (Mukesh Choudhary has been ruled out of the IPL 2023 ) आयपीएलमधून बाहेर गेलाय.
IPL 2023, CSK vs GT : गुरु-शिष्य आमनेसामने
दरम्यान, हार्दिक पांड्या (Hardik Pandya) धोनीला (MS Dhoni) आपला गुरू मानतो, असं त्याने अनेक वेळा सांगितलं आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई संघाचा सामना करायला त्याला आवडेल. गेल्या मोसमात शिष्य पांड्याच्या संघाने गुरु धोनीच्या संघाला दोनदा पराभूत केलं होतं.
शुभमन गिल त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम टप्प्यातून जात आहे आणि रशीद खानचा फॉर्मही चांगला आहे. पांड्याने स्वत: त्याच्या फिटनेसवर खूप मेहनत घेतली आहे आणि गेल्या आयपीएलमध्ये दुखापतीतून परतल्यानंतर त्याने बॉलिंग आणि बॅटवर घेतलेली मेहनत त्याच्या खेळातून दिसून येत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :