Indian Premier League 2023 : आयपीएल 2023 सुरुवात होण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. क्रीडा चाहत्यांमध्ये याची चर्चा सुरु आहे. मुंबई, चेन्नई आणि आरसीबीसह इतर संघाचे चाहते सोशल मीडियावर सक्रीय झाले आहेत. आयपीएल उद्घाटनापूर्वी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर चषकासोबत सर्व कर्णधारांचे फोटोशूट झाले... याचे फोटोही सोशळ मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण यावेळी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा कोणत्याच फोटोमध्ये दिसला नाही. यावरुन सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. काही जणांनी यावर मिम्सची पोस्ट केले आहेत.
यंदा आयपीएलचा पहिला सामना गतविजेता गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यादरम्यान होणार आहे. त्यापूर्वी सर्व संघाच्या कर्णधारांचे फोटोशूट करण्यात आले. नरेंद्र मोदी स्टेडिअमवर झालेल्या फोटोशूटमध्ये रोहित शर्मा दिसला नाही. त्यामुळे चर्चेला उधाण आले. फोटोशूटमध्ये एम. एस. धोनी, हार्दिक पांड्या यांच्यासह इतर संघाचे कर्णधारही दिसले. सनरायजर्स हैदराबाद संघाकडून भुवनेश्वर कुमार उपस्थित होता. कारण, एडन मार्करम अद्याप भारतात आलेला नाही, त्यामुळे मार्करमच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमार उपस्थित होता. त्याशिवाय कोलकाता संघाचा कर्णधार नितीश राणाही होता. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे यंदा आयपीएलला मुकणार आहे, त्याजागी संघाची धुरा नितीश राणा सांभाळणार आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा फोटोशूटवेळी उपस्थित नव्हता... याबाबत अद्याप कोणतेही कारण अथवा स्पष्टीकरण मिळालेले नाही. मुंबई आणि आरसीबी यांच्यादरम्यान दोन एप्रिल रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. पण फोटोशूटवेळी रोहित शर्मा उपस्थित नसल्यामुळे चर्चेला उधाण आलेय. कोण म्हणतेय, रोहित शर्मा सर्व खेळाडूंचे फोटो काढत होता.. तर कोण म्हणाले, रोहित शर्मा अहमदाबादला जायला विसरला... सोशल मीडियावर याबाबत मिम्स व्हायरल होत आहेत.
गतवर्षी मुंबईची खराब कामगिरी -
आयपीएल 2022 मध्ये मुंबईने निराशाजनक कामगिरी केली होती. गुणतालिकेत मुंबईचा संघ दहाव्या क्रमांकावर होता. गेल्यावर्षी मुंबईला 14 सामन्यात फक्त चार विजय मिळवता आले होते तर दहा सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. गेल्या हंगामातील कामगिरी विसरुन मुंबईचा संघ यंदा मैदानात उतरणार आहे.
आणखी वाचा :
आरसीबीला डबल धक्का! मॅक्सवेल-हेजलवूडच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह
इम्पॅक्ट प्लेअरचा इम्पॅक्ट पडणार, यंदाच्या आयपीएलमध्ये नवे नियम, जाणून घ्या सविस्तर
IPL 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करणं सोपं नाही; पाहा ताकद आणि कमजोरी