IPL records at the Narendra Modi Stadium : जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीग स्पर्धेला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. गतविजेता गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये सलामीची लढत होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गुजरात आणि चेन्नईचा संघ एकमेंकासोबत दोन हात करणार आहे. गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये आतापर्यंत दोन सामने झाले आहेत, यामध्ये हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाने बाजी मारली आहे. नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आयपीएल उद्घाटनाची संपूर्ण तयारी झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी आयपीएलच्या उद्घाटन समारंभात अनेक कलाकार परफॉर्म करणार आहेत. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअम अनेक विक्रमांचा साक्षीदार राहिले आहे. या मैदानाचे पूर्वीचे नाव मोटेरा क्रिकेट स्टेडिअम असे होते, त्याचे नाव सध्या नरेंद्र मोदी स्टेडिअम असे करण्यात आले आहे. पाहूयात आयपीएलमधील कोणते विक्रम या मैदानावर झाले आहेत....
Highest innings totals at the Narendra Modi Stadiumin the IPL (सर्वाधिक धावसंख्या करणारे संघ कोणते)