MI vs GT : वानखेडे मैदानवर आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)आणि गुजरात (Gujrat Titans)  यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. मुंबईचा पराभव करुन प्लेऑफ (PlayOff) मध्ये प्रवेश मिळवण्याचा गुजरातचा मानस आहे. तर गुजरातला हारवून प्लेऑफच्या शर्यतीत आपली जागा आणखी मजबूत करण्याचा उद्देश मुंबईचा असेल.  त्यामुळे या दोन्ही संघातली आजची लढत ही धमाकेदार होणार असल्याच्या चर्चा आता रंगत आहेत. पण मुंबईसाठी आजचा दिवस लकी आहे. कारण आयपीएलच्या इतिहासात 12 मे रोजी असणारा मुंबईचा प्रत्येक सामना मुंबईने जिंकला आहे. योगायोग म्हणजे याच दिवशी मुंबईच्या संघाचा माजी फलंदाज कायरन पोलार्ड याचा वाढदिवस देखील असतो.  मुंबईचा संघ कायरन पोलार्डच्या वाढदिवसाच्या दिवशी एकही सामना हारली नाही आहे. आजचा सामना जिंकून मुंबईचा संघ कायरान पोलार्डला वाढदिवसाची भेट देऊ शकते.. 


कायरन पोलार्ड मुंबईच्या फलंदाजीचा प्रशिक्षक 


वेस्ट इंडिजच्या संघाचा माजी कर्णधार कायरन पोलार्ड मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलचे 13 हंगाम खेळला आहे. पोलार्ड 2010 पासून मुंबईच्या संघाचा सदस्य आहे. तसेच आयपीएलमधून निवृत्त होईपर्यंत पोलार्ड मुंबईसाठीच खेळला. आयपीएलमध्ये फक्त एका संघासाठी खेळणाऱ्या मोजक्या क्रिकेटपटूंच्या यादीत त्याचा समावेश आहे. त्याच्या कारकिर्दीत मुंबईच्या संघाने पाच वेळा आयपीएलच्या किताबावर नाव कोरले आहे. आयपीएलच्या 16 व्या पर्वाआधी पोलार्डने निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर पोलार्ड मुंबईच्या फलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे.  पोलार्ड हा मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. त्याने मुंबईसाठी 3412 धावा केल्या आहेत.  ज्यात 16 अर्धशतकांचा समावेश आहे. 


पोलार्डचा वाढदिवस आणि मुंबईचा विजय, योगायोग


 कायरन  पोलार्डच्या वाढदिवसाच्या दिवशी मुंबई इंडियन्सचा संघ आजपर्यंत कोणताही सामना हरलेला नाही. 12 मे रोजी मुंबईने 2009 मध्ये पहिल्यांदा सामना खेळला होता. त्यावेळी पोलार्डचे आयपीएल पदार्पण झाले नव्हते. त्यानंतर सेंच्युरियन मैदानावर खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाबच्या संघाचा 8 विकेट्सने पराभव केला होता.  तेव्हापासून 12 मे रोजी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची विजयाची मालिका सुरूच आहे. गेल्या वर्षी १२ मे रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्धचा सामनाही मुंबई इंडियन्सने जिंकला होता. एकूणच काय पोलार्ड आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या संघासाठी लकी ठरला असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आज होणाऱ्या  सामन्यात गुजरातचा पराभव करत मुंबई आपल्या विजयाची मालिका सुरु ठेवणार का हे पाहणं रोमहर्षक ठरणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


MI vs GT : मुंबई आणि गुजरात यांच्यात वरचढ कोण? खेळपट्टी कशी? वाचा सविस्तर