Virat kohli, IPL 2022 : रॉयल चँलेंजर्स बेंगलोरने बुधवारी कोलकाता नाइट रायडर्सचा पराभव करत आयपीएलच्या 15 व्या हंगामातील पहिला विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. विराट कोहली स्वस्तात माघारी परतला. या सामन्यादरम्यान स्टेडिअममध्ये विराट कोहलीच्या चाहत्याने हातात घेतलेल्या पोस्टरची चर्चा झाली. सामन्यानंतरही हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 


आरसीबी आणि कोलकाता यांच्यातील सामन्याला विराट कोहलीच्या एका अतरंगी चाहत्याने हजेरी लावली होती. या चाहत्याच्या हातत एक पोस्टर होतं, त्यावरील मजकूराची सध्या चर्चा सरु आहे. या पोस्टरवर नेटकरी आपली प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, दुसऱ्या सामन्यात आरसीबीने विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात चांगल्या कामगिरीनंतर आरसीबीला पराभवाचा धक्का बसला होता. पंजाबबरोबर झालेल्या सामन्यात आरसीबीचा पाच विकेटने परभाव झाला होता. दुसऱ्या सामन्यात कोलकाताचा पराभव करत आरसीबीने दमदार सुरुवात केली आहे.  


काय आहे पोस्टरवर?
'माझ्या गर्लफ्रेंडने मला सोडलेय, कारण तिच्यापेक्षा मी विराट कोहलीला जास्त वेळ देतो. ' 


विराट कोहलीच्या चाहत्याच्या हातातील पोस्टर सध्या चर्चेचं कारण आहे. हा फोटो सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होत आहे. नेटकरी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. हा फोटो सोशल मीडियावर खूप शेअर होत आहे. 
 






असा पार पडला सामना


नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या कोलकाता संघाची खराब सुरुवात झाली. कोलकात्याचे सलामीवीर व्यंकटेश अय्यर आणि अजिंक्य राहणेला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अवघ्या 10 धावांवर असताना व्यंकटेश अय्यरनं आपली विकेट्स गमावली. त्यानंतर मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर अजिंक्य रहाणेही (9 धावा) बाद झाला. मात्र, त्यानंतर हसरंगानं त्याची जादू दाखवायला सुरुवात केली. त्याने श्रेयस अय्यरला अवघ्या 13 धावांवर माघारी धाडलं. त्यापाठोपाठ हसरंगानं लगेच जॅक्सनला बोल्ड केलं. त्यानंतर हसरंगानं पुन्हा एकदा आपली जादू दाखवत टीम साउथीनं अवघी एक धाव केलेली असताना त्याला बाद केलं. ज्यामुळं कोलकात्याच्या संघाला 20 षटकात सर्वबाद 128 धावापर्यंत मजल मारता आली. आरसीबीकडून वानिंदु हसरंगानं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, आकाश दीपनं तीन विकेट्स प्राप्त केल्या. हर्षल पटेलनं दोन तर, मोहम्मद सिराजनं एक विकेट्स घेतली. 129 धावांचा पाठलाग करताना आरसीबीच्या संघाची दमछाक होताना दिसली. आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (5 धावा) आणि अनूज रावत (0 धावा) स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर मैदानात आलेल्या विराट कोहली आणि डेव्हिड व्हिलीलाही चांगली कामगिरी करता आली नाही. विराटनं 7 चेंडूत 12 धावा केल्या. तर, व्हिलीनं 28 चेंडूत 18 धावा केल्या. आरसीबीकडून सर्फेन रदरफोर्डनं सर्वाधिक 28 धावांची खेळी केली. परंतु, टीम साऊथीनं 16 व्या षटकात त्याला बाद केलं. त्यानंतर मैदानात आलेला शाहबाज अहमद 27 धावा करून बाद झाला. आरसीबीनं सात विकेट्स गमावले असताना फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वानिंदु हसरंगालाही टीम साऊथीनं माघारी धाडलं. सामना कोलकात्याच्या बाजूला झुकलाय असं दिसत असताना दिनेश कार्तिक आणि हर्षल पटेलनं फटकेबाजी करत आरसीबीला तीन विकेट्सने विजय मिळवून दिला. कोलकात्याकडून टीम साऊथीनं सर्वाधिक तीन विकेट्स मिळवल्या. तर, उमेश यादवनं दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय, सुनिल नारायण आणि वरूण चक्रवर्ती यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.