IPL 2022, LSG vs CSK : लखनौचा कर्णधार केएल. राहुल याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चेन्नईचा संघ प्रथम फलंदाजी कऱण्यासाठी मैदानात उतरणार आहे. रविंद्र जाडेजा चेन्नईचं तर के. एल. राहुल लखनौचं नेतृत्व करत आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगमातील पहिल्या विजयासाठी लखनौ आणि चेन्नईचा संघ मैदानावर उतरणार आहेत. यंदाच्या हंगमातील पहिल्या सामन्यात दोन्ही संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे दोन्ही संघ विजयाच्या इराद्याने मैदानावर उतरतील. चेन्नई सुपरकिंग्सला पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) तर लखनौला गुजरात टायटन्सने (GT) मात दिली आहे.
आज होणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स आणि लखनौ सुपरजायंट्स या दोन्ही संघाचा विचार करता दोघांकडे तगड्या खेळाडूंचा भरणा आहे. पण पहिल्या सामन्यात दोन्ही संघाचे काही खेळाडू अनुपस्थित असल्याने फटका बसला होता. दोन्ही संघात काही खेळाडू आले आहेत. त्यामुळे प्लेईंग 11 मध्येही बदल दिसण्याची शक्यता आहे.
लखनौची प्लेईंग 11 -
केएल. राहुल, क्विंटन डि कॉक, इविन लुईस, मनिश पांडे, दीपक हुड्डा, आयुष बडोनी, क्रृणाल पांड्या, धुष्मंता चमिरा, अँड्रू टाय, रवी बिश्नोई, आवेश खान
चेन्नईची प्लेईंग 11 -
ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, रविंद्र जाडेजा, एम.एस धोनी, शिवम दुबे, डेवेन ब्राव्हो, ड्वेन प्रिटोरियस , तुशार देशपांडे, मुकेश चौधरी