SRH vs RCB, IPL 2022 Marathi News : कर्णधार फाफ डु प्लेसिस (73), रजत पाटीदार (48) आणि दिनेश कार्तिकच्या फटकेबाजीच्या जोरावर आरसीबीने निर्धारित 20 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात 192 धावांचा डोंगर उभा केला. दिनेश कार्तिकने अखेरच्या षटकात तुफानी फटकेबाजी केली. कार्तिकने अखेरच्या चार चेंडूवर 22 धावांचा पाऊस पाडला. दिनेश कार्तिकच्या फिनिशिंग टचच्या जोरावर आरसीबीने 190 धावांचा टप्पा पार केला. कार्तिकने तब्बल 375 च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला.
कार्तिकने हैदराबादच्या गोलंदाजांची पिसे काढली. कार्तिकने चार षटकार आणि एका चौकारासह आठ चेंडूवर 30 धावा काढल्या. कार्तिक फटकेबाजी करत असताना विराट कोहली ड्रेसिंग रुममध्ये जल्लोष करत असल्याचे दिसत होते. विराट कोहलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कार्तिक फटकेबाजी करुन माघारी परतल्यानंतर विराट कोहलीने मानवंदना दिली. विराट कोहलीने ड्रेसिंग रुमच्या दारावर थांबत गुडघ्यातून वाकून गार्ड ऑफ ऑनर दिला. विराट कोहलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर चर्चा...
दिनेश कार्तिची तुफान खेळी -
अखेरची दोन षटकं खेळायला आलेल्या दिनेशने तुफान फटकेबाजी सुरु केली. त्याने अवघ्या 8 चेंडूत 30 धावा कुटल्या. यात 4 षटकार आणि 1 चौकार त्याने लगावला. आज सलामीचा सामना खेळणाऱ्या एफ फारुकीला त्याने अखेरच्या षटकात 22 धावा ठोकल्या.
सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकत बंगळुरुने फलंदाजीचा निर्णय घेतला. सामना दुपारी असल्याने दुसऱ्या डावात दवाची अडचण येणार नाही त्यामुळे हा निर्णय घेतला. एक मोठी धावसंख्या उभारण्याची रणनीती बंगळुरुची होती. त्यात पहिल्याच चेंडूवर विराट शून्यावर बाद झाला. पण नंतर कर्णधार फाफ डु प्लेसीस आणि रजत पाटीदारने डाव सांभाळत एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला. दोघांनी धावसंख्या 100 च्या पुढे नेल्यानंतर विराटला बाद करणाऱ्या जे सुचितने रजतला 48 धावांवर तंबूत धाडलं. त्यानंतर मॅक्सवेल क्रिजवर आल्यानंतर त्यानेही डाव सांभळला. पण 33 धावा करुन तोही बाद झाला. कार्तिकने त्याला बाद केलं.