Virat Kohli: सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore) यांच्यात आयपीएलच्या पंधरव्या हंगामातील 54 वा सामना खेळला जात आहे. मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) हा सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून आरसीबीच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातील पहिल्याच चेंडूवर आरसीबीचा सलामीवीर विराट कोहली शून्यावर बाद झाला आहे. या हंगामात विराटनं तिसऱ्यांदा शून्यावर विकेट्स गमावली आहे. तर, आयपीएलमध्ये सहाव्यांदा तो गोल्डन डकचा शिकार ठरला आहे. 

विराट कसा झाला बाद? 
आरसीबीकडून विराट कोहली आणि फाफ फलंदाजीसाठी मैदानात उतरले होते. तर हैदराबादकडून जगदीशा सुचित पहिले षटक टाकले. सुचितच्या पहिल्याच चेंडूवर विराट कोहली विल्यमसनकडे झेल देऊन बाद झाला. याआधी हैदराबादविरोधात मार्को जानसेनने विराट कोहलीला गोल्डन डकवर आऊट केले होते. तर दुष्मांता चमीराने विराटला गोल्डन डक केले होते.

आयपीएलमध्ये विराट कोहलीनं साहव्यांदा शून्यावर बाद-

विरुद्ध संघ गोलंदाजाचं नाव वर्ष
मुंबई इंडियन्स आशीष नेहरा 2008
पंजाब किंग्ज संदीप शर्मा 2014
कोलकाता नाईट रायडर्स नाथन कुल्टर नाईल 2017
लखनौ सुपर जायंट्स दुष्मंता चमीरा 2022
सनरायजर्स हैदराबाद मार्को जेनसन 2022
सनरायजर्स हैदराबाद जे सुचित 2022

आयपीएल 2022 मधील विराट कोहलीचं प्रदर्शन-
1) 41*(29)
2) 12(7)
3) 5(6)
4) 48(36)
5) 1(3)
6) 12(14)
7) 0(1)
8) 0(1)
9) 9(10)
10) 58(53)
11) 30(33)
12) 0(1)

हैदराबाद आणि बंगळुरू प्लेईंग इलेव्हन-

सनरायझर्स हैदराबाद: अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (विकेटकीपर), शशांक सिंह, जगदीश सुचित, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, एफ.फारुकी, उमरान मलिक.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड.