Virat Kohli Golden Duck Out : मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर आरसीबी आणि हैदराबाद यांच्यामध्ये सामना रंगला आहे. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी दोन्ही संघाला विजय गरजेचा आहे. या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण आरसीबीची सुरुवात निराशाजनक झाली. माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा शून्य धावसंख्येवर बाद झाला. विराट कोहली यंदाच्या हंगामात तिसऱ्यांदा गोल्डन डकचा शिखार ठरला, तर आयपीएलमध्ये विराट सहाव्यांदा गोल्डन डक झालाय. कोहली गोल्डन डक झाल्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडलाय...
विराट कसा झाला बाद? -
आरसीबीकडून विराट कोहली आणि फाफ फलंदाजीसाठी मैदानात उतरले होते. तर हैदराबादकडून जगदीशा सुचित पहिले षटक टाकले. सुचितच्या पहिल्याच चेंडूवर विराट कोहली विल्यमसनकडे झेल देऊन बाद झाला. याआधी हैदराबादविरोधात मार्को जानसेनने विराट कोहलीला गोल्डन डकवर आऊट केले होते. तर दुष्मांता चमीराने विराटला गोल्डन डक केले होते.
विराट कोहली पुन्हा एकदा शून्यावर बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर मिम्स व्हायरल झाले. काहींनी विराट कोहलीच्या फलंदाजीवर नाराजी व्यक्त केली. तर काही नेटकरी सपोर्ट करताना दिसले. सोशल मीडियावर विराट कोहली ट्रेंडिगमध्ये आलाय. पाहा कोण काय म्हणाले...
आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या अंतिम 11 चा विचार करता बंगळुरु संघाने एकही बदल न करता मागील सामन्यात खेळवलेला तोच संघ आजही खेळवला आहे. तर हैदराबाद संघाने मात्र दोन महत्त्वाचे बदल केले आहेत. सीन एबॉट आणि श्रेयस गोपाल यांना विश्रांती देण्यात आली असून त्यांच्या जागी अफगाणिस्तानचा एफ. फारुकी आणि जे. सुचित यांना संधी देण्यात आली आहे. तर नेमके कोणते खेळाडू खेळणार आहेत यावर एक नजर फिरवूया...
हैदराबाद अंतिम 11
केन विलियमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मारक्रम, निकोलस पूरन, शशांक सिंह, जगदीश सुचिथ, भुवनेश्वर कुमार, एफ. फारुकी, कार्तिक त्यागी, उमरान मलिक
बंगळुरु अंतिम 11
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), शाहबाज अहमद, महिपाल लोमरोर, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड.