IPL 2022: आयपीएल 2022 च्या 33 व्या सामन्यात चेन्नईच्या संघानं मुंबईला (CSK Vs MI) तीन विकेट्स राखून पराभूत केलं. मुंबईला पराभूत करून चेन्नईच्या संघानं या हंगामातील दुसरा विजय मिळवला आहे. या विजयासह चेन्नईचा वेगवान गोलंदाज ड्वेन ब्राव्होनं (Dwayne Bravo) विक्रमाला गवसणी घातली आहे. या सामन्यात दोन विकेट्स घेऊन त्यानं एकाच संघाविरोधात 33 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. याआधी उमेश यादवनं (Umesh Yadav) अशी कामगिरी करून दाखवली आहे. 


एकाच संघाविरोधात ब्राव्होचे सर्वाधिक विकेट्स
मुंबईविरुद्ध सामन्यात ड्वेन ब्राव्होनं ऋतिक शॉकीन आणि डेनियल सॅम्सच्या रुपात मुंबईला दोन झटके दिले. या विकेट्ससह त्यानं आयपीएलमध्ये एकाच संघाविरोधात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत अव्वल स्थानी पोहचला आहे. ब्रोव्होच्या आधी उमेश यादवनं अशी कामगिरी केलीय. 


मुंबईविरोधात 33 विकेट्स घेण्याचा पराक्रम
या सामन्यात मुंबईनं प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 7 विकेट्स गमावून चेन्नईसमोर 156 धावांचं लक्ष्य ठेवलं. या सामन्यात ड्वेन ब्राव्होनं चार षटक टाकून 36 धावा देत दोन विकेट्स घेतल्या. त्यानं मुंबईविरोधात 33 विकेट्स घेण्याचा पराक्रम केलाय. या कामगिरीसह एकाच संघाविरोधात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत अव्वल स्थानी पोहचला आहे. 


यादीत उमेश यादव दुसऱ्या क्रमांकावर
उमेश यादवनं पंजाब किंग्जविरुद्ध सामन्यात एका संघाविरोधात 33 विकेट्स घेण्याचा विक्रम रचला होता. या यादीत कोलकात्याचा फिरकीपटू सुनील नारायण दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं पंजाबविरुद्ध 32 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. त्यानंतर माजी क्रिकेटपटू लसिथ मलिंगा 31 विकेट्ससह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं चेन्नईविरुद्ध अशी कामगिरी केलीय.


आयपीएलमध्ये एकाच संघाविरोधात सर्वाधिक विकेट्स-



ड्वेन ब्राव्हो- 33 विकेट्स (मुंबई इंडियन्स विरुद्ध)
उमेश यादव- 33 विकेट्स (पंजाब किंग्ज विरुद्ध)
सुनील नारायण- 32 विकेट्स (पंजाब किंग्ज विरुद्ध)
लसिथ मलिंगा- 31 विकेट्स (चेन्नई सुपर किंग्ज)


हे देखील वाचा-