Most Dot Balls in IPL : आयपीएलच्या 15 व्या हंगामाला सुरुवात होऊन महिना उलटला आहे. षटकार आणि चौकारांचा पाऊस पडणाऱ्या या स्पर्धेत गोलंदाजांनीही करिश्मा दाखवलाय. गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे फलंदाजांनी नांग्या टाकल्या आहेत. पॉवरप्ले आणि डेथ ओव्हरमध्ये धावांचा पाऊस पाडणारे फलंदाज मधल्या षटकात सावध पवित्रा घेत धावा करण्याचा प्रयत्न करतात. अशामध्ये डॉट बॉलचं प्रमाण जास्त आसते. पाहूयात... आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक डॉटबॉल टाकणाऱ्या पाच गोलंदाजाबद्दल 


हरभजन सिंह
भज्जीने क्रिकेटच्या सर्व प्रकरातून निवृत्ती घेतली आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक डॉटबॉल फेकण्याचा विक्रम हरभजनच्या नावावर आहे. भज्जीने आयपीएलमध्ये 160 डावात गोलंदाजी केली आहे. यामध्ये भज्जीने 1268 डॉट बॉल फेकले आहेत. भज्जीच्या नावावर 150 विकेट आहत. भज्जीने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक सामने खेळले आहेत.  


भुवनेश्वर कुमार
भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आयपीएलमध्ये सर्वाधिक निर्धाव चेंडू फेकणारा दुसरा गोलंदाज आहे. गेल्या काही दिवसांत दुखापतीशी सामना करणाऱ्या भुवनेश्वर कुमारच्या कामगिरीवर याचा परिणाम झाला आहे. पण भुवनेश्वर कुमारने आतापर्यंत 132 सामन्यात 1267 निर्धाव चेंडू फेकले आहेत. भुवनेश्वर कुमारने आयपीएलमध्ये 142  विकेट घेतल्या आहेत. 


 रविचंद्रन अश्विन
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर भारताचा फिरकीपटू आर अश्विनचा क्रमांक लागतो. अश्विनने 164 सामन्यात 1265 निर्धाव चेंडू फेकले आहेत. अश्विनच्या नावावर 145 विकेट आहेत. अश्विन दोन हंगामात पंजाब संघाचा कर्णधारही होता. 


सुनील नारायण
वेस्ट विंडिजचा फिरकीपटू सुनील नारायण या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. नारायणची गोलंदाजी आजही फलंदाजाला समजत नाही. नारायणच्या चेंडूवर मोठा फटका मारणे फलंदाजांना सहजासहजी शक्य होत नाही. नारायण याने 134 सामन्यात 1249 डॉटबॉल फेकले आहेत.  आयपीएलमध्ये नारायणच्या नावावर 143 विकेट आहेत. कोलकाताच्या यशात नारायणचा मोठा वाटा आहे.  


लसिथ मलिंगा
क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त झालेला लसिथ मलिंगा या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. मलिंगाने 122 सामन्यात 1155 डॉटबॉल टाकलेत. मलिंगाच्या नावावर 170 विकेट आहे. मलिंगाने आयपीएलमध्ये एकदा पाच तर सहा वेळा चार विकेट घेण्याचा पराक्रम केलाय.