IPL 2022 : यंदाच्या आयपीएलमधील (IPL 2022) 48 सामने आतापर्यंत पार पडले आहेत. 70 लीग सामन्यातील 48 सामने झाल्याने आता सर्व खेळाडूंचा फॉर्म कसा आहे? हे देखील बऱ्यापैकी स्पष्ट झालं आहे. आता हळूहळू कोणता संघ पुढील फेरीत पोहोचणार हे देखील स्पष्ट झालं असून गुजरात आणि लखनौ संघाचं पुढील फेरीत पोहोचणं जवळपास निश्चित झालं आहे. दरम्यान या सर्वात काही खेळाडूंचा खराब फॉर्म पाहून क्रिकेट फॅन्स हैरान झाले असून यातील काही नावं ही टी20 क्रिकेटमधील मोठी नावं आहेत. तर हे खेळाडू कोणते यावर एक नजर फिरवू...


केईरोन पोलार्ड


मुंबई इंडियन्स (MI) संघाचा स्टार ऑलराउंडर आणि उपकर्णधार केईरोन पोलार्ड यंदाच्या हंगामात अगदी खराब कामगिरी करत असून फलंदाजी-गोलंदाजी अशा दोन्हीमध्येही तो फ्लॉप दिसत आहे.  मुंबई इंडियन्सने (MI) आतापर्यंत 9 सामन्यांपैकी केवळ 1 सामना जिंकला आहे. मुंबई इंडियन्स (MI) सलग 8 सामने पराभूत झाल्यामुळे ते गुणतालिकेत खाली असून या सर्व सामन्यात पोलार्डने केवळ 125 रनच केले आहेत.


रवींद्र जाडेजा


चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाची कामगिरी देखील यंदा अत्यंत सुमार असून त्यांनीही 6 सामने गमावले आहेत. यावेळी संघाचं कर्णधारपद मागील सामन्यात पुन्हा धोनीने घेतलं असलं तरी त्याआधी जाडेजाकडे ही जबाबदारी होती. पण जाडेजाने कर्णधार म्हणूनच नाही तर खेळाडू म्हणूनही खराब कामगिरी केली. जाडेजाने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये खराब कामगिरी केली आहे. त्याने 9 सामन्यात 113 रन केले असून केवळ 6 विकेट्स घेतल्या आहेत.


मनीष पांडे


लखनौ सुपरजायंट्स (LSG) संघ कमाल कामगिरी करत असला तरी त्यांचा सीनियर खेळाडू मनीष पांडे मात्र खराब कामगिरी करत आहे. त्याने 9 सामन्यात केवळ 88 रन केले असून त्याचा बेस्ट स्कोर 38 धावा आहे. यावेळी पांडेचा स्ट्राईक रेट 110 इतकाच आहे.


जॉनी बेयरस्टो


पंजाब किंग्सने (PBKS) मोठी किंमत मोजून संघात घेतलेल्या जॉनी बेयरस्टोने देखील यंदा खराब कामगिरीत केली आहे. त्याने आतापर्यंत 7 सामन्यात 105.26 च्या सरासरीने केवळ 80 रन केले आहेत. यावेळी त्याचा बेस्ट स्कोर 32 धावा इतकाच होता.


ऋषभ पंत


दिल्ली कॅपिटल्स (DC) संघाचा कर्णधार ऋषभ पंत ही यंदा शांत दिसत असून हवी तशी कामगिरी त्याला करता येत नाही. ऋषभ पंतने 9 सामन्यात केवळ 234 रन बनवले असून यावेळी पंतचा स्ट्राइक रेट 149.04 इतकाच राहिला आहे. पंतचा बेस्ट स्कोर 44 इतकाच आहे.


हे देखील वाचा-