IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 49 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज (Royal Challengers Bangalore Vs Chennai Super Kings) आज ऐकमेकांशी भिडणार आहे. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) नव्या विक्रमाला गवसणी घालणार आहे. टी-20 क्रिकेटमधील 6000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी धोनीला फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीलाच (Virat Kohli) 6000 धावा करता आल्या आहेत. 


विक्रमापासून धोनी 6 धावा दूर
महेंद्रसिंह धोनीनं आतापर्यंत 301 टी-20 सामने खेळले आहेत. यातील 185 सामन्यात कर्णधार म्हणून त्यानं 5 हजार 994 धावा केल्या आहेत. आरसीबीविरुद्ध सामन्यात धोनीनं 6 धावा केल्यास, तो टी-20 क्रिकेटमधील 6000 धावांचा टप्पा पूर्ण करेल. कर्णधार म्हणून टी-20 क्रिकेटमध्ये 6000 धावा करणारा दुसरा खेळाडू ठरेल. याआधी विराट कोहलीनं कर्णधार म्हणून टी-20 क्रिकेटमधील 6000 धावांचा टप्पा गाठला आहे.


टी-20 क्रिकेटमध्ये 6000 धावांचा टप्पा गाठणार विराट पहिला कर्णधार
विराट कोहलीनं कर्णधार म्हणून 190 टी-20 सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 185 डावांमध्ये त्यानं 43.29 च्या सरासरीनं 6451 धावा केल्या आहेत. विराट हा कर्णधार म्हणून T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिला खेळाडू आहे. विराटनं टी-20 सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून फलंदाजी करताना 5 शतके आणि 48 अर्धशतके झळकावली आहेत. दुसरीकडे, धोनीनं कर्णधार म्हणून 38.67 च्या सरासरीने 5996 धावा केल्या आहेत. ज्यात 23 अर्धशतकांचा समावेश आहे.


आज चेन्नईशी भिडणार आरसीबी
रॉयल चॅलेंजर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आज आयपीएल 2022 मधील 49 वा सामना खेळला जाणार आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनी आणि फाफ डू प्लेसिस आमने- सामने येणार आहे. चेन्नईनं यंदाच्या हंगामात नऊ सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामन्यात चेन्नईला विजय मिळवता आला आहे. तर, सहा सामने गमावले आहेत. दुसरीकडं आरसीबीच्या संघानं दहा सामन्यांपैकी पाच सामन्यात विजय मिळवला आहे. तर, पाच सामन्यात पराभूत झाले आहेत.


हे देखील वाचा-