Mohammad Kaif, IPL XI : भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने आयपीएल ऑल-टाइम XI संघाची निवड केली आहे.  कैफने आपल्या संघात सहा विदेशी खेळाडूंना निवडले आहे. भारतीय संघाचा आणि चेन्नई सुपरकिंग्सचा माजी कर्णधार धोनीकडे कैफने आपल्या संघाचं नेतृत्व दिले आहे. कैफने आपल्या संघात सलामीसाठी वेस्ट विंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल आणि मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याला निवडले आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला स्थान दिलेय. 


ख्रिस गेल आपल्या विस्फोटक खेळीने सामना फिरवू शकतो. त्याची आयपीएलमधील कामगिरीही जबरदस्त आहे. तसेच रोहित शर्माने मुंबईला पाचवेळा आयपीएल चषक जिंकून दिला. त्याशिवाय विराट कोहलीनेही आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. यंदा विराट कोहलीची बॅट शांत आहे. पण त्याचं आयपीएलमधील प्रदर्शन नेहमीच कमालीचं राहिलेय, असे मोहम्मद कैफ म्हणाला.  


मध्यक्रममध्ये कैफ याने मिस्टर आयपीएल म्हणजेच सुरेश रैना, एम.एस धोनी आणि एबी डिव्हिलिअर्सला स्थान दिलेय. धोनीकडे विकेटकिपर आणि कर्णधारपदही सोपवले आहे. आंद्रे रसेलच्या रुपाने आणखी एक फिनिशरला कैफने संघात स्थान दिलेय. स्पोर्ट्सकीडासोबत बोलताना कैफ म्हणाला की, गेल विस्फोटक फलंदाज आहे, ज्या दिवशी त्याची बॅट चालते समोरील संघ तिथेच पराभूत होतो. त्याने आयपीएलमध्ये अनेकदा विस्फोटक खेळी केली आहे धोनीने भारताच्या टी 20 क्रिकेटसाठी मोठं योगदान दिलेय. पहिल्या टी 20 विश्वचषक विजयाचा तो कर्णधार आहे. धोनीसारखा फिनिशर आणि कर्णधार मिळणे कठीण आहे.  धोनीने भारताला दोन वर्ल्डकप जिंकून दिलेत. त्याशिवाय चेन्नईला चार आयपीएल चषकही जिंकून दिले आहेत.  


मोहम्मद कैफची ऑलटाईम आयपीएल XI पुढील प्रमाणे आहे....


ख्रिस गेल, रोहित शर्मा, विराट कोहली, एम एस धोनी (कर्णधार), सुरेश रैना, एबी डी विलियर्स, आंद्रे रसेल, राशिद खान, सुनील नारायण, जसप्रीत बुमराह, लासिथ मलिंगा


 


हे देखील वाचा-