IPL 2022, SRH vs RR Match Highlights : राजस्थानचा 61 धावांनी विजय, मार्करमची एकाकी झुंज
IPL 2022, SRH vs RR Match Live Updates : हैदराबाद आणि राजस्थान यांच्यात 15 व्या हंगामाचा पहिला सामना होत आहे. संजू सॅमसनपुढे अनुभवी केन विल्यमसनचे आव्हान आहे.
IPL 2022, SRH vs RR Match Live Updates : राजस्थानच्या भेदक माऱ्यापुढे हैदराबादचे फलंदाज अपयशी ठरले. राजस्थानने हैदराबादचा 61 धावांनी पराभव केला. 211 धावांचा पाठलाग करणाऱ्या हैदराबाद संघ 20 षटकात सात गड्यांच्या मोबदल्यात 149 धावांपर्यंत मजल मारु शकला.
IPL 2022, SRH vs RR Match Live Updates : हैदराबादला सातवा धक्का, बोल्टने घेतली विकेट
IPL 2022, SRH vs RR Match Live Updates : युजवेंद्र चहल याच्या भेदक माऱ्यापुढे हैदराबादची फलंदाजी ढेपाळली आहे. चहलने तीन बळी घेत हैदराबादची कंबर मोडली आहे. 15.4 षटकात हैदराबादने सहा गडी गमावत 78 धावा केल्या आहेत. सनरायजर्स हैदराबाद ला 38 चेंडूत 23.84 rpo प्रति ओवर सरासरी ने 151 धावांची गरज
भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी दिल्लीत शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली आहे. संजय राऊत यांच्या दिल्लीतील घरी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तीन तास चर्चा झाली. वरुण गांधी यांना संजय राऊत यांच्या घरी डिनरसाठी बोलावण्यात आले होते.
IPL 2022, SRH vs RR Match Live Updates : सनरायजर्स हैदराबादला दुसरा धक्का बसला आहे. केन विल्यमसन दोन धावांवर बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठी शुन्यावर बाद झाला आहे. तीन षटकानंतर हैदराबादच्या दोन बाद सात धावा झाल्या आहेत.
IPL 2022, SRH vs RR Match Live Updates : कर्णधार संजू सॅमसन, देवदत्त पड्डिकल आणि शिमरोन हेटमायर यांच्या विस्फोटक फंलदाजीच्या जोरावर राजस्थान संघाने निर्धारित 20 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 210 धावा केल्या आहेत.
IPL 2022, SRH vs RR Match Live Updates : भूवनेश्वर कुमारने विस्फोटक फलंदाजी करणाऱ्या संजू सॅमसनला बाद करत राजस्थानला चौथा धक्का दिला. संजूने वादळी अर्धशतकी खेळी केली
IPL 2022, SRH vs RR Match Live Updates : राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने विस्फोटक फलंदाजी केली. संजूने 25 चेंडूत 54 धावा केल्या. 16 षटकानंतर राजस्थान तीन बाद 163 धावा झाल्या आहेत.
IPL 2022, SRH vs RR Match Live Updates : उमरान मलिकने संजू आणि देवदत्त यांची जोडी फोडली. देवदत्त पडीकल 41 धावा करुन बाद झाला. राजस्थान 15 षटकानंतर तीन बाद 148 धावा
कर्णधार संजू सॅमसन आणि देवदत्त पड्डीकल यांच्या तुफान फटकेबाजी सुरु आहे. दोघांच्या विस्फोटक फलंदाजीपुढे हैदराबादची गोलंदाजी कमकुवत दिसत आहे. संजू सॅमसन 42 तर पड्डीकल 41 धावांवर खेळत आहे.
हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने राजस्थनाला दुसरा धक्का दिला आहे. विस्फोटक फलंदाज जोस बटलरा 35 धावांवर बाद केले. 10 षटकानंतर राजस्थान दोन बाद 87 धावा
IPL 2022, SRH vs RR Match Live Updates : राजस्थानच्या सलामी फलंदाजांनी दमदार सुरुवात केली आहे. जयस्वाल आणि बटलर यांनी चार षटकांत 36 धावा चोपल्या आहेत. बटलरने 20 चेंडूत 26 धावा चोपल्या आहेत. यामध्ये दोन षटकार आणि तीन चौकार लगावले.
IPL 2022, SRH vs RR Match Live Updates : अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाटी, केन विल्यमसन (कर्णधार), एडेन मार्करम, निकोलस पूरन, अब्दूल समद, आर शेफर्ड, वॉशिंगट सुंदर, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी नटराजन
IPL 2022, SRH vs RR Match Live Updates : यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार), शिमरोन हेटमायर, रियान पराग, नॅथन कुल्टर नाईळ, रविचंद्र अश्वन, यजुवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेंड बोल्ट
IPL 2022, SRH vs RR Match Live Updates : हैदराबादने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
IPL 2022, SRH vs RR Match Live Updates : थोड्याच वेळात होणार सामना
IPL 2022, SRH vs RR Match Live Updates : राजस्थान रॉयल्स संघाचा विचार करता जोस बटलर, देवदत्त पडिकल, संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायर या स्फोटक फलंदाजांवर सर्वांची नजर असेल. तर गोलंदाजीत युझवेंद्र चहल, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा आणि नवदीप सैनीची कामगिरी पाहण्याजोगी असेल. दुसरीकडे हैदराबाद संघाचा विचार करता राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन आणि कर्णधार केन विल्यमसन यांच्यावर फलंदाजीची जबाबदारी असेल. तर मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर गोलंदाजीची भिस्त असेल.
IPL 2022, SRH vs RR Match Live Updates : हैदराबादचा संघ पुण्याच्या एमसीए मैदानावर पोहचला
IPL 2022, SRH vs RR Match Live Updates : राजस्थान यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यासाठी मैदानात उतरणार
IPL 2022, SRH vs RR Match Live Updates : आयपीएलच्या 15 सामन्यात आजवर सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आमने-सामने आले आहेत. या 15 सामन्यांपैकी सनरायजर्स हैदराबादने 8 सामने जिंकले आहेत. तर राजस्थान रॉयल्सने 7 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे दोघांमध्ये आजवर तरी अटीतटीची लढत दिसून आली आहे. ज्यामुळे आजचा सामनाही चुरशीचा होणार यात शंका नाही. मागील सीजनचा विचार करता दोन सामने या संघामध्ये आपआपसांत झाले होते. ज्यात दोघांनी एक-एक सामना जिंकला होता.
पार्श्वभूमी
IPL 2022, SRH vs RR Match Live Updates : हैदराबाद आणि राजस्थान यांच्यात 15 व्या हंगामाचा पहिला सामना होत आहे. संजू सॅमसनपुढे अनुभवी केन विल्यमसनचे आव्हान आहे. हैद्राबादने या आधी दोन वेळा जेतेपद पटकावलं असून राजस्थानने पहिलं वहिलं आयपीएलचं टायटल पटकावलं होतं. पण मागील काही वर्षात दोन्ही संघाकडून सुमार खेळ दिसत आहे. त्यामुळे यंदा हे दोन्ही संघ कशी कामगिरी करणार याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. दोन्ही संघांनी महालिलावात दमदार खेळाडूंना विकत घेतल्याने आजचा सामना चुरशीचा होण्याची दाट शक्यता आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम अर्थात एमसीए मैदानात हा सामना खेळवला जाणार आहे.
आयपीएलच्या 15 सामन्यात आजवर सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आमने-सामने आले आहेत. या 15 सामन्यांपैकी सनरायजर्स हैदराबादने 8 सामने जिंकले आहेत. तर राजस्थान रॉयल्सने 7 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे दोघांमध्ये आजवर तरी अटीतटीची लढत दिसून आली आहे. ज्यामुळे आजचा सामनाही चुरशीचा होणार यात शंका नाही. मागील सीजनचा विचार करता दोन सामने या संघामध्ये आपआपसांत झाले होते. ज्यात दोघांनी एक-एक सामना जिंकला होता.
या खेळाडूंवर असेल साऱ्यांची नजर
राजस्थान रॉयल्स संघाचा विचार करता जोस बटलर, देवदत्त पडिकल, संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायर या स्फोटक फलंदाजांवर सर्वांची नजर असेल. तर गोलंदाजीत युझवेंद्र चहल, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा आणि नवदीप सैनीची कामगिरी पाहण्याजोगी असेल. दुसरीकडे हैदराबाद संघाचा विचार करता राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन आणि कर्णधार केन विल्यमसन यांच्यावर फलंदाजीची जबाबदारी असेल. तर मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर गोलंदाजीची भिस्त असेल.
राजस्थान रॉयल्सचे शिलेदार
संजू सॅमसन (14 कोटी), जोस बटलर (10 कोटी) यशस्वी जैस्वाल (4 कोटी), रवीचंद्रन आश्विन (5 कोटी), ट्रेण्ट बोल्ट (8 कोटी), शिमरॉन हेटमायर (8.50 कोटी), देवदत्त पडिक्कल (7.75 कोटी), प्रसिध कृष्णा (10 कोटी), युजवेंद्र चहल (6.50 कोटी), पराग रियान (3.8 कोटी), केसी करिअप्पा (30 लाख), नवदीप सैनी (2.60 कोटी), महिपाल लोमरोर (95 लाख), ओबेद मेकॉय (75 लाख), चामा मिलिंद (25 लाख), अनुनयसिंग (20 लाख).
हैदराबादचा संपूर्ण संघ -
केन विल्यमसन (कर्णधार), अब्दुल समद, उमरान मलिक, वॉशिंगटन सुंदर, निकोलस पूरन, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, प्रियम गर्ग, राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा, कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल, जगदीश सुचिन, एडेन मार्करम, मार्को यानसन, रोमारियो शेफर्ड, शॉन एबॉट, आर समर्थ, सौरभ दुबे, शशांक सिंह, विष्णु विनोद, ग्लेन फिलिप्स, फजलाक फारूकी.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -