IPL 2022, SRH vs LSG Highlights : लखनौचा सलग दुसरा विजय, हैदराबादचा 12 धावांनी पराभव

SRH vs LSG, IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील आजचा बारावा सामना लखनौ सुपरजायंट्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात पार पडणार असून दोन्ही संघाकडून विजयासाठी शर्थीचे प्रयत्न होणार हे नक्की.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Apr 2022 11:47 PM
लखनौचा सलग दुसरा विजय, हैदराबादचा 12 धावांनी पराभव

हैदराबादविरुद्ध आज खेळण्यात आलेल्या सामन्यात लखनौच्या संघानं 12 धावांनी विजय मिळवला आहे. हा लखनौच्या संघाचा दुसरा विजय आहे.

IPL 2022: हैदराबादनं चौथा विकेट्स गमावला, राहुल त्रिपाठी बाद

राहुल त्रिपाठीच्या रुपात हैदराबादच्या संघानं चौथा विकेट्स गमावला आहे. त्यानं 30 चेंडूत 44 धावा केल्या. 

IPL 2022: क्रुणाल पांड्यानं मार्करामला धाडलं माघारी, हैदराबादला तिसरा झटका

क्रुणाल पांड्याच्या गोलंदाजीवर हैदराबादचा फलंदाज मार्करामनं आपली विकेट्स गमावली आहे. हैदराबादला जिंकण्यासाठी 55 चेंडूत 87 धावांची गरज आहे.

SRH vs LSG : आवेशला आणखी एक यश, अभिषेक शर्मालाही केलं बाद

आवेश खानने केन विल्यमसननंतर आता अभिषेक शर्मालाही बाद केलं आहे. शर्मा 13 धावा करुन बाद झाला आहे.

SRH vs LSG : हैदराबादला मोठा झटका, कर्णधार केन बाद

आवेश खानने हैदराबादचा कर्णधार केनला झेलबाद केलं आहे. 16 धावा करुन केन तंबूत परतला.

SRH vs LSG : लखनौ संघाचा डाव आटोपला, हैदराबादसमोर 170 धावांचं आव्हान

लखनौ संघाने 20 षटकात 169 धावा करत 7 विकेट्स गमावले आहेत. त्यामुळे आता विजयासाठी हैदराबादला 170 धावांची गरज आहे.

SRH vs LSG : टी नटराजनला आणखी एक यश

टी नटराजनने शानदार यॉर्कर टाकत कृणाल पंड्याला त्रिफळाचित केलं आहे.

SRH vs LSG : लखनौला मोठा झटका, केएल राहुल बाद

68 धावा करुन के.एल राहुल तंबूत परतला आहे. टी नटराजनने त्याला पायचीत केलं आहे.

SRH vs LSG : कर्णधार केएल राहुलचं अर्धशतक पूर्ण

केएल राहुलने 28 वं आयपीएलमधील अर्धशतक पूर्ण केलं आहे. त्याने 40 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे.

SRH vs LSG : रोमारियो शेफर्डने घेतली हुडाची विकेट

51 धावा केल्यानंतर दीपक हुडा तंबूत परतला आहे. रोमारियो शेफर्डने राहुल त्रिपाठीच्या हाती त्याला झेलबाद केलं आहे

SRH vs LSG : दीपक हुडाचं अर्धशतक पूर्ण

दीपक हुडाने 31 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या असून त्यामुळे संघाला मोठा फायदा झाला आहे.

SRH vs LSG : हुडा-राहुलने सांभाळला डाव

सुरुवातीचे गडी पटापट बाद झाल्यानंतर आता दीपक आणि राहुलने लखनौचा खेळ सांभाळला आहे. दोघेबही अर्धशतकाजवळ पोहोचले आहेत.

SRH vs LSG : हैद्रबादसाठी महागडी ओव्हर

लखनौ संघाला एक चांगली ओव्हर मिळाली. उम्रान मलिकच्या एका षटकात राहुल आणि दीपक हुडाने मिळून 20 धावा केल्या आहेत.

SRH vs LSG : 9 षटकानंतर लखनौ 48 वर 3 बाद

 लखनौ संघाने 9 षटकात 48 धावा केल्या असून हैदराबादने 3 गडी बाद केले आहेत.

SRH vs LSG : लखनौला आणखी एक झटका, मनिष पांडे बाद

लखनौला 30 धावांच्या आतच तीन झटके लागले असून शेफार्ड याने मनीष पांडेला झेलबाद केलं आहे.

SRH vs LSG : सुंदरने घेतली दुसरी विकेट, लुईस बाद

वॉशिंग्टन सुंदरने आणखी एक बळी घेत एविन लुईसला पायचीत केलं आहे.

SRH vs LSG : वॉशिंग्टन सुंदरने बाद केलं डी कॉकला

लखनौ संघाला पहिला झटका बसला असून वॉशिंग्टन सुंदरने क्विंटन डी कॉकला विल्यसमनच्या हाती झेलबाद केलं आहे.

SRH vs LSG : सामन्याला सुरुवात, राहुल डी कॉक फलंदाजीला

सामन्याला सुरुवात झाली असून भुवनेश्वर प्रथम गोलंदाजीला आला असून राहुल आणि क्विंटन फलंदाजी करत आहेत.

लखनौ अंतिम 11 

केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डि कॉक (विकेटकीपर), एविन लुईस, मनीष पांडे, दीपक हु़डा, आयुष बदोनी, क्रुणाल पंड्या, जेसन होल्डर, अँड्रयू टाय, रवी बिश्नोई, आवेश खान

हैदराबादचे अंतिम 11

अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, केन विलियमसन (कर्णधार), निकोलस पूरन (विकेटकीपर), अॅडन मार्करम, अब्दुल समाद, वॉशिंग्टन सुंदर, रोमारियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उम्रान मलिक.


 

SRH vs LSG Toss Update : हैदराबादने निवडली गोलंदाजी

नुकतीच नाणेफेक झाली असून सनरायजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली आहे.

LSG vs SRH : आज यॉर्कर किंग नटराजनचा वाढदिवस

हैदराबादच्या स्टार गोलंदाज टी नटराजनचा आज वाढदिवस असून हैदराबाद संघाने वाढदिवस उत्साहात साजरा केला.


 





आज सायंकाळी रंगणार हैदराबाद विरुद्ध लखनौ युद्ध

आज 4 एप्रिल रोजी होणारा हा सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.


 





पार्श्वभूमी

SRH vs LSG, Live Updates : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज पार पडणाऱ्या सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपरजायंट्स या सामन्यात दोन्ही संघातील दमदार खेळाडूंमुळे सामना चुरशीचा होणार यात शंका नाही. दोन्ही संघाना आजचा विजय महत्त्वाचा आहे. कारण हैदराबादने पहिला सामना गमावला असून लखनौलाही एक पराभव मिळाला आहे. दरम्यान आजचा सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडिअममध्ये (D.Y. Patil Stadium) होणार आहे. 


केन विलियम्सनच्या (Kane Williamson) नेतृत्वाखाली हैदराबादला (SRH) यंदाच्या स्पर्धेत पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे के.एल. राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वाखाली लखनौला (LSG) गुजरातकडून (GL) पराभवाचा सामना करावा लागला, तर चेन्नई सुपर किंग्जला (CSK) हरवून लखनौने पहिला विजय मिळवला. आजच्या सामन्यात जेसन होल्डर या दमदार कॅरेबियन खेळाडूमुळे लखनौकडे पावर हिटींग असेल. तर दुसरीकडे सनरायजर्स हैदराबादची फलंदाजीची भिस्त कर्णधार केनसह राहुल त्रिपाठी आणि कॅरेबियन खेळाडू निकोलस पूरनवर असेल. गोलंदाजीमध्ये दोन्ही संघाकडे उत्तम खेळाडू असल्याने सामना पाहण्याजोगा होईल.


हैदराबादचे संभाव्य अंतिम 11  


अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, केन विलियमसन (कर्णधार), निकोलस पूरन (विकेटकीपर), अॅडन मार्करम, अब्दुल समाद, वॉशिंग्टन सुंदर, रोमारियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उम्रान मलिक.


लखनौ संभाव्य अंतिम 11 


केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डि कॉक (विकेटकीपर), एविन लुईस, मनीष पांडे, दीपक हु़डा, आयुष बदोनी, क्रुणाल पंड्या, दुश्मंता चमीरा, अँड्रयू टाय, रवी बिश्नोई, आवेश खान


 हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha




- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.