SRH Vs CSK: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 46 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने येणार आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर उद्या हा सामना खेळला जाणार आहे. यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जनं निराशाजक कामगिरी करून दाखवली आहे. रवींद्र जाडेजाच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघानं 8 पैकी 6 सामने गमावले आहेत. तर, दुसरीकडं सुरुवातीच्या दोन सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर हैदराबादच्या संघानं जोरदार कमबॅक केलंय. हैदराबादनं 8 पैकी 5 सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. 


कधी, कुठे पाहणार सामना?
सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना 1 मे रोजी  पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 07.30 वाजता सुरू होईल. सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज  यांच्यातील टी -20 सामन्याचे प्रसारण स्टार नेटवर्कवर होईल.हॉटस्टार डॉट कॉमवर सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील यांच्यातील सामन्याचे थेट ऑनलाईन प्रसारण तुम्ही पाहू शकता. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल. 


जाडेजानं कर्णधारपद सोडलं, महेंद्रसिंह धोनी पुन्हा कर्णधार
आयपीएलच्या 15 व्या हंगामाच्या आधी एमएस धोनीने चेन्नईच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. चेन्नईने रविंद्र जाडेजाकडे कर्णधारपद दिले होते. पण आयपीएलमध्ये जाडेजाच्या नेतृत्वात चेन्नईची कामगिरी खराब झाली. चेन्नईला आठ सामन्यात फक्त दोन विजय मिळवता आले. सहा पराभव झाल्यामुळे चार गुणांसह चेन्नईचा संघ सध्या नवव्या क्रमांकावर आहे. चेन्नईचे प्लेऑफमध्ये पोहचण्याचं आव्हान खडतर झालेय. उर्वरित एकाही सामन्यात चेन्नईचा पराभव झाल्यास प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात येऊ शकते. यातच रवींद्र जाडेजानं चेन्नईचं कर्णधारपद सोडलं असून चेन्नईच्या पुढील सामन्यात महेंद्रसिंह धोनी संघाची धुरा संभाळणार आहे. 


हे देखील वाचा-