GT vs SRH : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजचा 40 वा सामना आहे. या सामन्यात गुजरात टायटन्स संघ विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (GT vs SRH) अशी लढत पार पडत आहे. सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे हैदराबादने गुजरातसमोर 196 धावांचे आव्हान समोर ठेवले आहे.



सामन्यात प्रथम गुजरातने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी हैदराबादला कमी धावांत रोखण्याची रणनीती केली होती. पण शर्मा आणि मार्करम जोडीने गुजरातचा हा प्लॅन फेल करत धुवांदार फटकेबाजी केली. सुरुवातीला कर्णधार केन 5 तर राहुल त्रिपाठी 16 धावा करुन तंबूत परतल्यानंतर गुजरात मजबूत स्थितीत वाटक होते. पण मग अभिषेक शर्मा आणि एडन मार्करम यांनी मात्र दमदार अशी फटकेबाजी करत संघाचा डाव सावरला. शर्माने 42 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकार ठोकत 65 धावा केल्या. तर मार्करमने 40 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकार ठोकत 56 धावा केल्या. या दोघांच्या भक्कम भागिदारी नंतर अखेरच्या षटकात युवा खेळाडू शशांक सिंह याने अनुभवी लॉकी फर्ग्यूसन याला फटकेबाजी करत लागोपाठ तीन षटकार खेचले ज्यामुळे गुजरातला आता विजयासाठी 196 धावांची गरज आहे.


राशिद-लॉकी पडले महाग


गुजरातकडून मोहम्मद शमीने उत्तम सुरुवात केली. त्याने सर्वाधिक तीन विकेट्सही घेतल्या. याशिवाय जोसेफ आणि यश यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली. पण दिग्गज गोलंदाज राशिद आणि लॉकी हे मात्र आज महाग पडले राशिदला चार षटकात 45 तर लॉकीला चार षटकात 52 धावा आल्या.


हे देखील वाचा-