RR vs RCB : आयपीएलमध्ये आज दोन रॉयल संघामध्ये लढत पाहायला मिळणार आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु(RR vs RCB) यांच्यातील आजच्या सामन्यात दोन्ही संघाकडून मैदानात उतरणारे खेळाडू विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त करतील यात शंका नाही. दरम्यान राजस्थान संघाने आतापर्यंत हंगामात सर्वात दमदार कामगिरी केली असून सध्या ते पॉईंट टेबलमध्येही अव्वल स्थानावर आहेत. दुसरीकडे आरसीबी संघाने सुमार कामगिरी केली दोन पैकी एक सामना जिंकला असून एक सामन्यात ते पराभूत झाले आहेत.


आरसीबीच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. दुखातीमुळे लवनीथ सिसोदीया हंगामातून बाहेर पडला आहे आहे. सिसोदीयाला संपूर्ण हंगामापासून मुकावं लागणार आहे. त्यामुळे टीममध्ये त्याच्या जागी रजत पाटीदारचा (Rajat Patidar) समावेश करण्यात आला आहे.


कधी आहे सामना?


आज 5 एप्रिल रोजी होणारा हा राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.  


कुठे आहे सामना?


हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.


कुठे पाहता येणार सामना?


राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha